मुंबई -पश्चिम बंगालमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून बंगालमध्ये इतर राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईतून गावी जाणाऱ्या पश्चिम बंगलाच्या श्रमिकांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल काढण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
देशातील इतर राज्यांसोबतच पश्चिम बंगालमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, अशा स्थितीतही बंगालमध्ये विधान सभा निवडणूक पार पडली आहे. यामुळे, बंगाल राज्याची परिस्थिती आणखीच चिंताजनक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात श्रमिक वर्गही बंगालच्या निवडणूकीत मतदानासाठी गेले होते. त्यांनी आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. मात्र, बंगालच्या राज्य शासनाने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी बंगलामध्ये इतर राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यांची अंमलबजावणी सुरु करण्यांत आली आहे. तसेच राज्य सरकारने 'ब्रेक द चेन'ची घोषणा केल्यानंतर लाखोंच्या संख्येने परप्रांतीयांनी मुंबईतून काढता पाय घेण्यास सुरूवात केली होती. तर, आता देशभरात लाॅकडाऊन लागल्याचे संकेत वर्तविण्यात असल्याने बंगालमधील मजुर, कामगार, इतर प्रवाशांचे लोंढेच्या लोंढे आता महाराष्ट्रातून आपल्या राज्यात जात आहे. मात्र, आता बंगालमध्ये आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे.