मुंबई - सर्वत्र गेले दीड वर्षापासून कोरोनाचा प्रसार सुरू आहे. हा प्रसार कमी होत असतानाच आता आरएसव्ही व्हायरसचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हा व्हायरस वातावरणातील बदलामुळे होत असून तो व्हायरल फिव्हरचा प्रकार आहे. मुंबईकरांनी घाबरण्याचे कारण नाही, लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्यावी असे आवाहन पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.
आरएसव्ही व्हायरस वाढण्याची भीती -
मागील दीड वर्षापासून कोरोनाशी लढा सुरु आहे. सध्या कोरोना नियंत्रणात आहे. मात्र आरएसव्ही व्हायरसचा प्रसार वाढण्याची भीती आहे. आरएसव्ही हा कोरोनासारखा जीवघेणा व्हायरस नाही. मात्र वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे. मान्सून संपला असला, तरी काही भागात पाऊस पडतो आहे. आरएसव्ही व्हायरस हा वातावरणातील बदलामुळे होत असून तो व्हायरल फिव्हरचा प्रकार आहे, घाबरून जाण्याचे कारण नाही, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.
चाचणीकरून घेण्याचे प्रशासनाचे आवाहन -