मुंबई - दहीहंडी उत्सवात मृत्युमुखी पडलेल्या संदेश दळवी या तरुणाला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दहा लाख रुपयाची मदत करण्यात आली आहे. राज्य सरकारने गोविंदा उत्सवात अपघाती मृत्यू आलेल्या गोविंदाला दहा लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. Eknath Shinde Govt त्यानुसार राज्य सरकारकडून मृत तरुणांच्या वडिलांच्या नावे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते मदत निधी त्यांच्या वडिलांना देण्यात आला आहे.
सर्व जखमी गोविंदावर योग्य उपचार राज्यात गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा देण्याची तसेच मृत गोविंदांच्या कुटुंबियांना १० लाख, दोन अवयव गमावल्यांना ७.५० लाख, जखमींना ५ लाख रुपये आणि सर्वांवर मोफत उपचाराची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व जखमी गोविंदावर योग्य उपचार व्हावेत, कुणाचाही मृत्यू होऊ नये, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सात अधिकाऱ्यांचे पथक नेमले होते अशी माहिती मुख्यमंत्री शिंद यांनी यावेळी दिली.