मुंबई - कोरोना काळात मदतीसाठी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त लोकसहभाग लाभला. आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर मदतीचा ओघ कमी झाला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ( CM Assistance Fund ) यामुळे सुमारे 606 कोटी रुपये पडून असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाऊन लागू केला. वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडला. आरोग्य सुविधा देण्यासाठी निधी अपुरा पडू लागला. राज्य शासनाने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी कोविडचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले. ७९९ कोटी रुपये याअंतर्गत जमा झाले. पैकी १९२ कोटी खर्च झाले असून ६०६ कोटी रुपये खात्यात जमा असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सचिवालयाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे यासंदर्भातील माहिती मागवली होती.
असा झाला खर्च -
- सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये कोविड आयसीयू सेटअपसाठी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत खर्च केले.
- कोविडच्या २५ हजार चाचण्यांसाठी पीसीआर मशीनच्या कझुमेबल्स विकत घेण्यासाठी ३ कोटी ८२ लाख ५० हजार खर्च केले आहेत.
- औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वे दुर्घनेटतील मृतांच्या नातेवाईकांना ८० लाखांचे अर्थसहाय्य देण्यात आले.
- स्थलांतरित मजुरांचे श्रमिक रेल्वे शुल्कासाठी ८२ कोटी ४६ लाख ९४ हजार २३१ रुपये खर्च केले आहेत.
- रत्नागिरी आणि जालना जिल्ह्यात कोविड चाचण्यासाठी १ कोटी ७ लाख ६ हजार ९२० रुपये खर्च केले.
- प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्यासाठी १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, ४ पालिका वैद्यकीय महाविद्यालय, १ टीएमसी वैद्यकीय महाविद्यालयला १६.८५ कोटी रुपये दिले आहेत.
- माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानासाठी १५ कोटी रुपये आयुक्त आणि राज्य स्वास्थ्य संस्थांना दिले.
- देहविक्री करणाऱ्या महिलांना ४९ कोटी ७६ लाख १५ हजार ९४१ कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले.
- तर कोविड आजारांतर्फत म्युटंट मधील व्हेरिएंटच्या संशोधनासाठी जिमोन सिव्केसिंग १ कोटी ९१ लाख १६ हजार खर्च केल्याचे राज्य शासनाचे म्हणणे आहे.
हेही वाचा -Covid Vaccination : लहान मुलांना लस व ज्येष्ठांना बूस्टर डोससाठी केंद्राकडे मागणी - राजेश टोपे