मुंबई -देशाच्या आर्थिक राजधानीला वीजपुरवठा करणार्या कंपनी अदानी एनर्जीच्या कार्यालयात 16 लाख रुपयांची चोरी झाली आहे. दिंडोशी विभागाच्या कार्यालयातून कुलूप उघडून हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अदानी एनर्जीमध्ये चोरीची ही दुसरी घटना आहे.
अदानी एनर्जीच्या दिंडोशी कार्यालयाकडून कुलूप उघडून लेखा विभागातील सुमारे 16 लाख रुपये गायब झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. चोरीच्या घटनेनंतर कुरार पोलिसांनी घटनास्थळी अदानी कार्यालयाची तपासणी केली. पोलिसांनी कुरार पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध चोरीच्या (380) कलम आणि 457 च्या चोरीच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी बाबासाहेब साळुंखे म्हणाले की, पोलीस तेथे काम करणाऱ्या डझनभर कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत. गुन्ह्यातील चोराचा आम्ही शोध घेत आहोत.
हेही वाचा-भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी सूचना देऊनही सीसीटीव्ही बसविण्याकडे दुर्लक्ष-
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी अदानी एनर्जीमध्ये 5 लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेत अदानी अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडून 5 लाख रुपये वसूल केले. त्यावेळी कुरार पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा सल्ला दिला होता. पण आजपर्यंत तिथे कॅमेरे बसविण्यात आले नव्हते. चोरीची दुसरी घटना याच कार्यालयातून समोर आली आहे. अशा परिस्थितीत तेथे काम करणारे कर्मचारी सामील होऊ शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्या आधारे कुरार पोलिस आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
हेही वाचा-फरार पत्रकार बोठे विरुद्ध महिलेची बदनामी, खंडणीचा गुन्हा दाखल
दिंडोशी अदानी कार्यालयात काम करणारया एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते कार्यालय खासगी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. याच कार्यालयातील अधिकाऱ्याने कुरार पोलिसांना तक्रार दिली आहे. चोरीची घटनेत बिल वसूल केलेली दोन दिवसांची रोकड चोरीला गेली आहे.