मुंबई- एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा मुंबईतल्या आझाद मैदानात संप सुरू आहे. मंगळवारी (दि. 16) रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला (ST employees agitation) भेट देऊन संवाद साधत रिपब्लिकन पक्षाचा एसटी कामगारांच्या संपाला जाहीर पाठिंबा दिला.
एसटी नसती तर मी पुढारी नसतो -
रामदास आठवले यांनी संपातील कर्मचाऱ्यांनाशी संवाद साधत आपल्या खास काव्यमय शैलित महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. एसटीचे झाले नाही विलीनीकरण, तर ठाकरे सरकारचे होणार मरण, कर्मचारी येणार नाहीत शरण, कारण सरकारचे होणार आहे मरण, अशा शब्दात आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला. ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी लढा तीव्र करावा लागेल, असा इशारा देत रामदास आठवले यांनी शरद पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असे म्हटले आहे. एसटी नसती तर मी पुढारी नसतो असेही आठवले यांनी म्हटले आहे.