मुंबई - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी रामदास आठवले यांना द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) केली आहे. रामदास आठवले यांना उमेदवारी न दिल्यास रिपाइंचे कार्यकर्ते बंड पुकारतील. पंधरा वर्षांचा इतिहास आहे, रामदास आठवले जिकडे तिकडेच सत्ता असते याचा विचार करावा अन्यथा यामुळे भाजप शिवसेनेला सत्ता गमवावी लागेल असा इशारा रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
रिपाइंची भाजपला थेट धमकी; आठवलेंना उमेदवारी न दिल्यास सत्ता विसरा.. - सत्ता
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा रिपाइंला न दिल्यास भाजप-शिवसेनेला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रभर बंड पुकारणार असल्याचे रिपाइंच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

भाजप-सेना हे सत्ताधारी असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला वगळून महायुतीची भाषा करतात. त्यामुळे भाजप व शिवसेनेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे. पंधरा वर्षांचा इतिहास आहे की, रामदास आठवले व त्यांचे समर्थक ज्यांच्या बाजून असतात त्यांची सत्ता येते. भाजप शिवसेना ही संधी गमावू पाहते आहे, अशीच आजची स्थिती आहे.
त्यामुळे भाजप-शिवसेनेने ईशान्य मुंबईतील जागा आठवले यांना दिली नाही तर, भाजप व शिवसेनेविरोधात उभे राहून आपली दिशा ठरवणार आहेत. भाजप व शिवसेनेला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रभर बंड पुकारु, असे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीधर साळवे यांनी सांगितले.