महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

RPF Jawan Saves Live : आरपीएफच्या जवानाने वाचवला प्रवाशाचा जीव.. दादर रेल्वे स्थानकातील थरारक घटना

रेल्वेमधून उतरत असताना गाडी आणि रेल्वे फलाटाच्या दरम्यान मोकळ्या जागेत पडलेल्या प्रवाशाचा जीव आरपीएफच्या जवानाने ( RPF Jawan Saves Live ) वाचविला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली ( Incident Captured In CCTV ) आहे. दादरच्या रेल्वे स्थानकावर ( Dadar Railway Station ) ही घटना घडली.

त्या जवानांनी वाचवला  प्रवाशाचा जीव: दादर रेल्वे स्थानकातील थरारक घटना
त्या जवानांनी वाचवला प्रवाशाचा जीव: दादर रेल्वे स्थानकातील थरारक घटना

By

Published : Mar 25, 2022, 5:33 PM IST

मुंबई : मध्य रेल्वेचा दादर रेल्वे स्थानकात ( Dadar Railway Station ) धावत्या ट्रेन क्रमांक 12112 अमरावती एक्स्प्रेसमधून उतरताना एका प्रवासी फलाट आणि गाडी यांच्यातील मोकळ्या जागेत पडला. त्यावेळी कर्तव्यावर तैनात असलेल्या आरपीएफ जवानाने प्रसंगावधान दाखवून त्या प्रवाशाचा जीव ( RPF Jawan Saves Live ) वाचवला. स्थानकांवर घडलेली संपूर्ण घटना दादर रेल्वे स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात टिपली गेली ( Incident Captured In CCTV ) आहे.

आरपीएफच्या जवानाने वाचवला प्रवाशाचा जीव.. दादर रेल्वे स्थानकातील थरारक घटना


अशी घडली घटना : मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 6 च्या सुमारास मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 6 वर अमरावती एक्स्प्रेस आली होती. त्यानंतर आपल्या ठरलेल्या वेळेनंतर गंतव्य स्थानकाकडे अमरावती एक्स्प्रेस रवाना होत होती. यादरम्यान एक प्रवासी धावत्या ट्रेनमधून उतरत असताना त्या प्रवाशाचा तोल गेला आणि त्याचे संतुलन बिघडले. परिणामी ट्रेनच्या दरवाजाला अडकून फरफटत तो प्रवासी जात होता. तेव्हा कर्तव्यावर असलेले आरपीएफ जवान ऋतुराज राठौड़ यांनी रेल्वे गाडीकडे धाव घेतली. या आरपीएफ जवानाने ट्रेन खाली जात असलेल्या प्रवाश्याला मागे ओढले आणि त्याचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना दादर रेल्वे स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.


घटनेचा व्हिडीओ वॉयरल-ही घटना रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये टिपली गेली असून, सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आरपीएफ जवान ऋतुराज राठौड़ यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, धावती ट्रेन पकडू आणि उतरू नये असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details