महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आरपीएफ महिला जवानाने वाचवला महिला प्रवाशाचा जीव; स्टॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकातील थरारक घटना - Central Railway

ट्रेनमधून चढत असताना वृद्ध महिला प्रवासीचा तोल गेल्याने रेल्वे खाली जाणाऱ्या आजीचे प्राण एका आरपीएफ महिला कॉन्स्टेबलने वाचवले. ही घटना स्टॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात घडली असून हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

वाचवला महिला प्रवाशाचा जीव
वाचवला महिला प्रवाशाचा जीव

By

Published : Oct 22, 2021, 7:44 AM IST

मुंबई- धावत्या ट्रेनमधून चढत असताना वृद्ध महिला प्रवासीचा तोल गेल्याने रेल्वे खाली जाणाऱ्या आजीचे प्राण एका आरपीएफ महिला कॉन्स्टेबलने वाचवले. ही घटना स्टॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात घडली असून हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आरपीएफ महिला कॉंन्स्टेबलचे नाव सपना गोलकर असून तिच्या प्रसंगावधानमुळे त्या आजीचा जीव वाचवला आहे. त्यामुळे सर्वत्र महिला कॉंन्स्टेबल सपना गोलकर यांचे कौतुक होत आहे.

आरपीएफ महिला जवानाने वाचवला महिला प्रवाशाचा जीव

अशी घडली घटना-

मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 3 च्या सुमारास बदलापूरला जाणारी धीमी लोकल स्टॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वरून आली होती. नंतर काही मिनिटांत आपल्या गंतव्य स्थानकाकडे ही लोकल रवाना होत होती. लोकल ट्रेनचा वेग धिमा असताना एक वृद्ध महिला प्रवासी धावत ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, ट्रेनच्या दरवाज्यामधून आत जाणे त्या महिलेला जमत नव्हते. या दरम्यान त्या वृद्ध महिलेचा तोल गेल्या ती खाली पडत होती. रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या पोकळीत पडत असताना कर्तव्यांवर असलेल्या महिला आरपीएफ काँन्स्टेबल सपना गोलकर हिने समयसूचकता दाखवून त्या वृद्ध महिलेला ट्रेन जवळून खेचून प्राण वाचविले आहे. या महिला काँन्स्टेबलच्या धाडसी कामाची दखल आरपीएफ, मध्य रेल्वे प्रशासन यांच्याकडून घेण्यात आली आहे.

सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद-

ही संपूर्ण घटना स्टॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच आरपीएफचा महिला कॉंन्स्टेबलचे सपना गोलकर यांच्या प्रसंगावधान दाखवत या प्रवाशांचे प्राण वाचवले त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details