मुंबई- बॉलीवूड चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी चित्रपटांमधील त्याच्या जबरदस्त ॲक्शनसाठी ओळखला जातो. रोहितच्या चित्रपटांमध्ये ॲक्शनसोबतच एक प्रकारचा सामाजिक संदेशही असतो. आता त्याने मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या निर्भया पथकाचा ( Nirbhaya Squad Mumbai ) व्हिडिओ बनवला ( Rohit Shetty Nirbhaya Squad Video ) आहे. हा व्हिडिओ मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत मुंबई पोलिसांनी लिहिले आहे की, 'लांघ कर तू लक्ष्मणरेखा, बन निडर, बन निर्भया'. या व्हिडिओचे अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केले आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केला ( Mumbai Police Women Helpline ) आहे.
महिलांसाठी निर्भया पथक
प्रजासत्ताक दिनाचे ( Republic Day 2022 ) औचित्य साधून मुंबई पोलिसांकडून आज निर्भया पथकाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून, मुंबईत महिला सुरक्षेकरिता ( Mumbai Police Women Safety ) निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी निर्भया पथक हा विशेष विभाग असणार आहे. मुंबई महिला रात्रीच्या वेळेस सुद्धा काम करून घरी जात असताना त्यांच्या मदतीला धावण्यासाठी ह्या महिला पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या मुंबईला पथकाला बोलावण्याकरिता १०३ हा हेल्पलाइन नंबर सुद्धा असणार आहे. या निर्भया पथकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मुंबई पोलिसांकडून शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ अनेक सेलिब्रिटींनी देखील शेअर केला आहे.