महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

व्हॅलेंटाईननिमित्त रोड सेफ्टी डे.. जोडप्यांना मोफत हेलमेट देऊन जीवन सुरक्षेची अमूल्य भेट - रस्ते सुरक्षा महिना उपक्रम

मीरा रोड वाहतूक पोलीस दलातर्फे रस्ते सुरक्षा महिना उपक्रम चालवला जात आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात रोड सेफ्टी अभियानाच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

Road Safety Day for Valentine's Day
Road Safety Day for Valentine's Day

By

Published : Feb 14, 2021, 12:25 PM IST

मुंबई - मीरा रोड वाहतूक पोलीस दलातर्फे रस्ते सुरक्षा माह उपक्रम चालवला जात आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात रोड सेफ्टी अभियानाच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर मोटरसायकलस्वारी करताना हेलमेटचे महत्व याविषयी जनजागृती अभियान चालवले जात आहे.

व्हॅलेंटाईननिमित्त रोड सेफ्टी डे
यावर्षी या अभियानात व्हॅलेंटाईननिमित्त मोसेस चिनप्पा फाउंडेशन द्वारे रस्ते सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून विना हेलमेट प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना हेलमेट भेट देऊन त्यांना हेलमेटचे महत्व सांगितले जात आहे. आयोजक मोसेस यांनी सांगितले, की रस्ते अपघातात अधिक मृत्यू हे विना हेलमेट प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचे होत आहेत. यामुळे अनेक मुले अनाथ होतात तर कित्येक महिला विधवा होतात. मात्र लोक दोन लाखांची मोटारसायकल खरेदी करतात मात्र ५०० रुपयांचे हेलमेट विकत घेत नाहीत.मोसेस यांनी सांगितले, की व्हॅलेंटाईन डे च्या निमित्त लोक आपल्या प्रेयसीला चॉकलेट, टेडी बेअर सारख्या अनेक वस्तू भेट देतात. परंतु एखाद्यांचा जीव वाचवणाऱ्या हेलमेटची भेट कधी देत नाहीत. त्यामुळे आम्ही वाहतूक पोलिसांच्या सहाय्याने विना हेलमेट प्रवास करणाऱ्या तरुणांना व जोडप्यांना हेलमेटचे मोफत वितरण करून त्यांच्या जीवनाची भेट त्यांच्या कुटुंबीयांना देण्याचा संकल्प केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details