मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे ( Director General of Police Sanjay Pandey ) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आज सोमवार (दि. 10) रोजी रियाज भाटी यानी याचिका ( Riyaz Bhati petition in HC ) दाखल केली. या याचिकेमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या बैठका होत होत्या. माझ्यावर दबाव आणून ठाण्यात मला परमबीर सिंग यांच्या विरोधात साक्ष द्यायला सांगितली होती. असा आरोप रियाज भाटी यांनी ( Riyaz Bhati allegations on Anil Deshmukh ) याचिकेत केला आहे.
...म्हणून मुंबईत माझ्यावर गुन्हा दाखल केला -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर बैठका होत होत्या. अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर पहिली बैठक 31 मार्च 2021 या दिवशी झाली होती. परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईत तक्रार दाखल केली नाही म्हणून मुंबईत माझ्यावर गुन्हा दाखल केला गेला असे भाटीचा आरोप आहे.