महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्तीच्या वडिलांची पुन्हा चौकशी सुरू - sushantsingh rajput demise

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची मागील 12 दिवसांपासून सीबीआय चौकशी सुरू आहे. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी म्हणून रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. या खटल्याशी संबंधित अन्य व्यक्तींचे जबाब देखील नोंदवण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर रिया चक्रवर्तीच्या वडिलांची पुन्हा चौकशी सुरू झाली आहे.

riya chakraborti with CBI
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्तीच्या वडिलांची पुन्हा चौकशी होणार?

By

Published : Sep 2, 2020, 10:27 AM IST

Updated : Sep 2, 2020, 12:09 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांकडून सुरुवातीच्या टप्प्यात तपास सुरू असताना अचानक सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या संदर्भात मागील 12 दिवसांपासून सीबीआय तपास सुरू आहे. आतापर्यंत रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, कुक केशव, नीरज, सिद्धार्थ पिठाणी व इतर व्यक्तींची चौकशी केल्यानंतर मंगळवारी रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित चक्रवर्ती व तिच्या आईची सुद्धा सीबीआयने चौकशी केली आहे. मात्र सुशांतची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. याच प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या वडिलांची पुन्हा चौकशी सुरू झाली आहे.

सुशांत सिंहची मॅनेजर श्रुती मोदी यांचेही नाव सीबीआयने दाखल केलेला गुन्ह्यात नोंदवण्यात आलेले आहे. श्रुती मोदीचे वकील अशोक सरोगी यांनी सुशांत सिंहच्या मानसिक आजाराबद्दल त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पूर्णपणे माहिती असल्याचे सांगितले. याचं कारण म्हणजे 26 नोव्हेंबर 2019 रोजी सुशांतच्या तीन बहिणी मुंबईत त्याच्याजवळ उपस्थित होत्या.

27 नोव्हेंबर 2019 रोजी सुशांत सिंह आपल्या बहिणी सोबत पटना येथे जाणार होता . त्यासाठी त्यांनी विमानाची बिजनेस क्लास तिकीटं बुक केली होती. मात्र सुशांत सिंह वर सुरू असलेल्या उपचारांच्या औषधांचे प्रीस्क्रीप्शन हवे असल्यामुळे त्याने श्रुती मोदीला याबद्दल विचारले होते. औषधांची यादी ही रिया चक्रवर्तीला माहित असल्याचे व्हॉट्सअॅप वर श्रुती मोदीने सुशांतला सांगितले. याच कारणावरून सुशांत आणि त्याच्या बहिणीत वाद झाल्याचेही वकील अशोक सरोगी यांनी म्हटलं आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्तीच्या वडिलांची पुन्हा चौकशी होणार?

सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासा दरम्यान त्याच्या कुटुंबीयांची जबानी घेण्यात आली होती. यामध्ये सुशांत सिंहच्या दोन बहिणी प्रियांका तनवर, मितु सिंग व मेव्हणा सिद्धार्थ तणवर यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले होते. सुशांतच्या मानसिक आजाराबद्दल त्यांना 2013 पासून माहिती होती, असे या नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान मुंबईतील डीआरडीओ कार्यालय येथे असलेल्या सीबीआय पथकासमोर रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांना पुन्हा बोलावले आहे.

Last Updated : Sep 2, 2020, 12:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details