मुंबई:शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार (Rituja Latke will contest election on torch symbol) असल्याची, ऋतुजा लटके (Rituja Latke) यांनी नुकतीच घोषणा केली आहे. महालिकेत पत्रकारांशी बोलत असतांना त्यांनी ही घोषणा केली. त्यांनी नियमानुसार एक महिन्याचा पगार पालिकेकडे जमा केला आहे. माझी सही बाकी आहे. मी गेले ३ दिवस कार्यालयात येवून बसत आहे. आज आयुक्तांची भेट घेवून राजीनामा मंजूर करण्याची मागणी करणार आहे, असेही ऋतुजा लटके यांनी यावेळी सांगितले.Andheri East election
मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार :अंधेरी पूर्व येथील पोट पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा याआधी रंगत होती. मात्र आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केले आहे. तेव्हा त्यांना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली असल्याचे कळते.
प्रतिक्रिया देतांना ऋतुजा लटकें
मशाल चिन्हावर निवडणूक लढणार :ऋतुजा लटके या आपला राजीनामा देण्याबाबत बाबत पालिका मुख्यालयात आल्या होत्या. यावेळी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उप महापौर हेमांगी वरळीकर, माजी नगरसेवक चंद्र शेखर वायंगणकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना, 'शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी राजीनामा दिला आहे. नियमानुसार एक महिन्याचा पगार पालिकेकडे जमा केला आहे. माझी सही बाकी आहे, असं सांगितलं जात आहे. मी गेले ३ दिवस कार्यालयात येवून बसत आहे. आज आयुक्तांची भेट घेवून राजीनामा मंजूर करण्याची मागणी करणार आहे', असे ऋतुजा लटके यांनी सांगितले.
ऋतुजा लटके पालिकेत :अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिका कर्मचारी असून; त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. मात्र हा राजीनामा मंजूर केला नसल्याने आज त्यांनी आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांचे पी ए असलेले सह आयुक्त चंद्रशेखर चोरे यांच्या कार्यालयात त्या दुपारी १.३० च्या दरम्यान दाखल झाल्या. सुमारे अर्धा तास वाट पाहिल्यावर त्यांना चोरे यांनी भेटीसाठी बोलावले.Andheri East election