महाराष्ट्र

maharashtra

Rutuja Latke Hearing : ठाकरे गटाची धाकधूक वाढली.. ऋतुजा लटकेंची हायकोर्टात धाव.. उद्या 'असं' होण्याची शक्यता

By

Published : Oct 12, 2022, 3:52 PM IST

Updated : Oct 12, 2022, 4:13 PM IST

मुंबई - अंधेरी पूर्व ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा लटके ( Thackeray group candidate Rituja Latke ) यांनी मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) धाव घेतली ( Rituja Latke moves Bombay High Court ) आहे. लटके याचिकेवर उद्या होणार सुनावणी आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून संबंधित BMC ला नोटीस ( Notice to BMC from High Court ) बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

Rutuja Latke Hearing
तुजा लटकेंच्या याचिकेवर उद्या होणार सुनावणी

मुंबई - अंधेरी पूर्व ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा लटके ( Thackeray group candidate Rituja Latke ) यांनी मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) धाव घेतली ( Rituja Latke moves Bombay High Court ) आहे. लटके याचिकेवर उद्या होणार सुनावणी आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून संबंधित BMC ला नोटीस ( Notice to BMC from High Court ) बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

राजीनामा अद्यापही मंजूर नाही - मुंबई उच्च न्यायालयाकडून संबंधित BMC ला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेने ऋतुजा लटके महापालिकेत परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. ऋतुजा लटके यांनी एक महिना अगोदर दिलेला राजीनामा अद्यापही मंजूर न केल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ऋतुजा लटके यांची बाजू वकील विश्वजित सावंत यांनी मांडली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा लटके यांनी या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी याकरिता खंडपीठासमोर मेंशनिंग दरम्यान मागणी केली होती 14 ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने यावर उद्याच तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.

उच्च न्यायालयात धाव -ऋतुजा लटके यांनी त्यांच्या याचिकेत असे म्हटले आहे की, तीन तारखेला राजीनामा देण्यात आला आहे. मात्र, अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाही. नोटीस स्प्रेडच्या तीस दिवस पूर्ण होत नसल्याचे कारण दिले असल्याने नियमाप्रमाणे एका महिन्याचा पगार देखील जमा करण्यात आला आहे. तसेच राजीनामा देता वेळी देण्यात आलेल्या कारणांमध्ये कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यात येणार आहे या संदर्भात मी कुठलाही उल्लेख केलेला नाही. मात्र मला अंधेरी पोट निवडणूक लढवण्याचे इच्छा असल्याने राजीनामा मंजूर करण्यात यावा असे राजीनामा म्हटले आहे. मात्र तरीदेखील अद्यापही राजीनामा मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Last Updated : Oct 12, 2022, 4:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details