महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

घर खरेदीत वाढ, जुलै महिन्यात सर्वाधिक घर खरेदीची नोंद

2021 च्या जुलै महिन्यात झालेल्या घर विक्रीने गेल्या दहा वर्षाच्या विक्रम मोडला आहे. 2012 पासून आतापर्यंतच्या सर्व जुलै महिन्यांपैकी यंदाच्या जुलै महिन्यात सुमारे 7 हजार 856 घरांची विक्री झाली आहे.

The highest number of home purchases in the month of July
जुलै महिन्यात सर्वाधिक घर खरेदीची नोंद

By

Published : Aug 2, 2021, 10:47 PM IST

मुंबई- कोरोनामुळे अनेक व्यवसायांचे कंबरडे अक्षरशः मोडले आहे. मोठ्या आर्थिक नुकसानीलादेखील सामोरे जावे लागले आहे. मात्र घर खरेदीला चांगले दिवस आले आहेत. जुलै महिन्यात झालेल्या घर विक्रीने गेल्या दहा वर्षाच्या विक्रम मोडला आहे. 2012 पासून आतापर्यंतच्या सर्व जुलै महिन्यांपैकी यंदाच्या जुलै महिन्यात सुमारे 7 हजार 856 घरांची विक्री झाली आहे.

मुंबईत काही महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाले आहेत. यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. मागील वर्षी या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. या क्षेत्राला पुन्हा गती देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत लागू केली होती. या कालावधीतही मोठ्या प्रमाणात घर खरेदी झाली. सरकारने दिलेली सवलत संपुष्ठात आली आहे.

मात्र विकासकांनी दिलेल्या चांगले प्रस्ताव दिल्यामुळे मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रातील उलाढाल वाढत चालली आहे. नवीन गृह प्रकल्पामध्ये घरांची खरेदी विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे, हे जुलैमध्ये खरेदी झालेल्या संख्या वरून दिसत आहे. ही माहिती मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. घरांची मागणी अधिक असल्याने घर खरेदी नोंदणीत वाढ होत राहणार असल्याचे दिसत आहे.

जुलै 2021 च्या 29 जुलै पर्यंत 8 हजार 939 घरांची खरेदी नोंदणी झाली.
तर जुलै 2020 मध्ये 2 हजार 662
जुलै 2019 मध्ये 5 हजार 748
जुलै 2018 मध्ये 6 हजार 437
जुलै 2017 मध्ये 6 हजार 95
जुलै 2016 मध्ये 5 हजार 725
जुलै 2015 मध्ये 5 हजार 832
जुलै 2014 मध्ये 5 हजार 253
जुलै 2013 मध्ये 5 हजार 139
जुलै 2012 मध्ये 7 हजार 367

हेही वाचा - Break The Chain : राज्यातील लॉकडाऊन शिथील, मात्र ११ जिल्ह्यात लॉकडाऊनचे नियम कायम

ABOUT THE AUTHOR

...view details