मुंबई:Rikshaw Taxi Fare Hike: परिवहन विभागाने (Mumbai Transport Department) रिक्षाच्या भाडेवाडीला मान्यता दिल्यामुळे आजपासून मीटर 21 रुपये होते तिथे आता 23 रुपये झालेले आहे तर टॅक्सीचे भाडे 25 रुपये होते ते आता 28 रुपये झालेले आहे.
तसेच रात्री बारानंतर जर रिक्षा मधून प्रवास करायचा असेल तर दीड किलोमीटरला आधी 27 रुपये द्यावे लागत होते. आता दोन रुपये जास्त द्यावे लागणार आहे म्हणजे 29 रुपये आपल्याला द्यावे लागणार आहेत. तर टॅक्सी करता पूर्वी 32 रुपये द्यावे लागत होते. आता तीन रुपये त्यात वाढून 35 रुपये आता द्यावे लागणार आहे.(Increase in rickshaw and taxi fares)