नवी मुंबई -मीटर प्रमाणे पैसे आकारल्याने नवी मुंबईतील अबोली रिक्षाचालक महिलेला रिक्षात बसलेल्या प्रवाशांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी नेरूळमध्ये घडली आहे. संबंधित महिला ही सीबीडी बेलापूर मधून नेरूळ सेक्टर 10 येथे रिक्षामधून प्रवासी घेऊन येत होती. मात्र उतरताना झालेल्या प्रवासी भाड्याच्या वादातून महिलेला चक्क प्रवाशांनी मारहाण केली. याप्रकरणामुळे अबोली रिक्षाचालक महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची दखल घेत भाजपा नेत्या चित्रा वाघ या मारहाण झालेल्या महिलेच्या भेटीस आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी संबधित महिलेला झालेली मारहाण ही अंत्यत दुर्दैवी असल्याचे म्हटले.
काय आहे प्रकरण -
नवी मुंबईत अबोली रिक्षाचालक संघटना आहे. त्यामध्ये केवळ महिलाच रिक्षाचालक असतात. महिला रिक्षाचालक सविता बेले या सीबीडी बेलापूर येथे रिक्षा घेऊन भाड्यासाठी मंगळवारी प्रवाशांची वाट पाहत होत्या. त्याचवेळी स्टँडवर पती-पत्नी त्यांचा मुलगा व मुलगी अशा चार व्यक्ती आल्या व त्यांनी सविता यांना भाड्यासाठी विचारणा केली. सविता यांनी एका वेळी तीनच व्यक्ती रिक्षात बसू शकतात चार नाही असे समजावले. मात्र आपण एकाच कुटुंबातील असून, तीन व्यक्ती एका रिक्षातून गेलो तर उर्वरित एका व्यक्तीला दुसरी रिक्षा करावी लागेल. त्यामुळे आम्हाला एकाच रिक्षातून न्या, अशी विनवणी या कुटुंबाने अबोली रिक्षाचालक सविता बेले यांना केली. हे कुटुंब नेरूळ सेक्टर 10 येथे पोहोचल्यावर सविता बेले यांनी मीटरप्रमाणे 75 रुपये झाल्याचे सांगितले. मात्र आम्ही नेहमी पन्नास रुपये देतो असे म्हणत सविता यांच्याशी संबंधित कुटुंबाने वादविवाद करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी या कुटुंबातील मुलीने सविता यांच्या रिक्षाची चावी काढून घेतली. चावी घेतल्यावर मात्र सविता यांनी विरोध केला असता या कुटुंबांतील चारही सदस्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप सविता बेले यांनी केला आहे. ही मारहाण इतकी जबर होती की, बेले यांना वाशी येथील महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
महिलेला मारहाण होणं अंत्यत दुर्दैवी -