मुंबई -पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा निकटवर्तीय समजला जाणारा रियाझुद्दीन काझी यानेसुद्धा स्कॉर्पिओ गाडीचे पुरावे नष्ट केले होते. याचा खुलासा सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आला आहे. रियाजुद्दीन काझी हा स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात माफीचा साक्षीदार होणार असल्याची चर्चा आहे. यासंबंधी एनआयएनने तब्बल ८ ते ९ दिवस रोज सलग दहा तास काझीची चौकशी केली आहे.
विक्रोळीतील गॅरेजजवळील सीसीटीव्हीत काझी कैद हेही वाचा -..मग हाथरसच्या घटनेवेळी शाह गप्प का होते? ममतांचा सवाल
रियाजुद्दीन काझीचा व्हिडिओ आला समोर -
स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी संदर्भात अनेक पुरावे नष्ट करण्याचे काम वाझे आणि त्याच्या सहकाऱ्याने केले होते. याच संदर्भात सचिन वाझेच्या जवळचा असलेला पोलीस उपनिरीक्षक रियाजुद्दीन काझी याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
विक्रोळीतील गॅरेजजवळील सीसीटीव्हीत काझी कैद
25 फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतील कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. यासंदर्भातील पुरावे नष्ट करण्याकरता काझी मुंबईतील विक्रोळी कन्नमवार नगर येथे असलेल्या बंटी नावाच्या एका गॅरेजमध्ये गेला होता. त्या ठिकाणी असलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआर रियाजुद्दीन काझीने ताब्यात घेतला होता. तसेच गॅरेज चालक सावंत नावाच्या व्यक्तीलादेखील चौकशीसाठी घेऊन गेले होते. दरम्यान, या संदर्भातील कोणतीच नोंद मुंबई क्राईम ब्राँचच्या स्टेशन डायरीत नमूद केले नसल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, याच बंटी गॅरेजमध्ये सचिन वाझे टीमने गाड्यांसाठी बनावट नंबर प्लेट बनवल्या होत्या. या गोष्टी कुठे तपासात समोर येऊ नये याकरता पुरावे नष्ट केले जात होते. यादरम्यान रियाजुद्दीन काझी हा विक्रोळी कन्नमवार नगर येथील बंटी नावाच्या गॅरेजमध्ये गेला होता. हा प्रकार जवळच असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. तो आता तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. यावरूनच रियाजुद्दीन काझीची चौकशी देखील करण्यात आली होती.
हेही वाचा -बंगालमधील भाजपा कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू; तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप