महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - रिया चक्रवर्ती न्यूज

रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.

sushant
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण

By

Published : Sep 8, 2020, 4:06 PM IST

Updated : Sep 8, 2020, 10:43 PM IST

मुंबई - रिया चक्रवर्तीला आज एनसीबीकडून अटक केली आहे. एनसीबी कार्यालयात सध्या रियाची तिसर्‍या दिवशी चौकशी केली जात आहे. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला आधीपासूनच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. याआधी एनसीबीने रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे.

मेडिकल टेस्टसाठी रिया चक्रवर्तीला सायन हॉस्पिटलमध्ये आणले...

दरम्यान, रिया चक्रवर्तीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

एनसीबीचे विशेष पथक हे २८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आले होते. त्यानंतर १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेश यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.

Last Updated : Sep 8, 2020, 10:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details