महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis: ज्यांनी बंड केले त्यांनी राजीनामे द्यावे आणि निवडणुकीला सामोरे जावे - आदित्य ठाकरे - बंडखोर आमदारांनी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जावे

ज्यांनी बंड केले आहे त्यांनी राजीनामे द्यावे आणि निवडणुकीला सामोरे जावे ( revolted MLA ministers should resign and face election ) असे आदित्य ठाकरेंनी म्हणाले आहे. माथेरानमध्ये शिवसेनेचे शहर संपर्कप्रमुख प्रसाद सावंत यांच्यावर १५ जणांच्या जमावाने हल्ला (Mob Attack on Shiv Sena's city liaison chief ) केला. या हल्ल्यात त्यांना जबर मारहाण करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर प्रसाद सावंत यांची भेट घेण्यासाठी रात्री उशीरा आदित्य ठाकरे हे कामोठे एमजीएम हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भावना व्यक्त केल्या.

Aditya Thackeray
Aditya Thackeray

By

Published : Jun 28, 2022, 10:09 AM IST

नवी मुंबई :ज्यांनी बंड केले आहे त्यांनी राजीनामे द्यावे आणि निवडणुकीला सामोरे जावे ( revolted MLA ministers should resign and face election ) असे आदित्य ठाकरेंनी म्हणाले आहे. माथेरानमध्ये शिवसेनेचे शहर संपर्कप्रमुख प्रसाद सावंत यांच्यावर १५ जणांच्या जमावाने हल्ला (Mob Attack on Shiv Sena's city liaison chief ) केला आहे. या हल्ल्यात त्यांना जबर मारहाण करण्यात आली. झालेल्या मारहाणीत ते जखमी झाल्याने त्यांना नवी मुंबईतील कळंबोळी येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले ( Prasad Sawant admitted in MGM Hospital ) होते. त्या पार्श्वभूमीवर प्रसाद सावंत यांची भेट घेण्यासाठी रात्री उशीरा आदित्य ठाकरे हे कामोठे एमजीएम हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांविषयीच्या भावना व्यक्त केल्या.


सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अभ्यास करून त्यावर बोलणे उचित ठरेल -सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अभ्यास करून त्यावर बोलणे उचित ठरेल असेही आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे. शिवाय बंडखोरी करणाऱ्या आमदारांना ते जर खरोखरच शिवसैनिक असतील, तर त्यांनी परत यावे असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

आदित्य ठाकरे

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : राज्य सरकारने घाईघाईत घेतलेले निर्णय व जीआरचे स्पष्टीकरण द्या, राज्यपालांचे राज्य सरकारला आदेश

फुटीरवादी आमदार पळून गेलेले आहेत. त्यांना बंड करायचे असते तर त्यांनी इथे केले असते. गुहावटीला जाऊन त्यांनी ते बंड केले. यात त्यांनी काही आमदारांना फसवून नेले, तर काहींना किडनॅप केले ( revolted MLA deceived and kidnapped other MLAs ) आहे. ज्या आमदारांनी बंड केले त्यांनी राजीनामे द्यावे आणि निवडणुकीला सामोरे जावे असे उद्गार आदित्य ठाकरे यांनी केले आहेत.

सध्या राज्यातली राजकीय परिस्थीती पाहता महविकास आघाडी सरकार अडचणीत आलेले आहे. शिवसेनेते बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून समर्थक आमदारांसह त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात भाजपकडून त्यांना फूस असल्याचा चर्चा सध्या राजकीय वर्तूळात आहे.

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : 29 जूनला भाजप आमदारांना मुंबई येण्याच्या सूचना, सत्तास्थापनेच्या हालचाली?

ABOUT THE AUTHOR

...view details