मुंबई - विद्यापीठामधील एचटीई सेवार्थ प्रणालीमध्ये प्रवेशित न झालेल्या शेकडो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार आहे. त्यांची सेवार्थ प्रणालीत नोंद न झाल्याने त्यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न रखडला होता. त्यामुळे त्यांच्या सेवा नियमित असल्याचे समजून त्यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मुंबई विद्यापीठातील 'या' शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार निवृत्तीवेतनाचा लाभ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतना बाद्दल बातमी
मुंबई विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतना बद्दलचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत घेतला. याचा लाभ मुंबई विद्यापीठातील १४८ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे.
मुंबई विद्यापीठाने विद्यापीठामधील शासन मान्य पदावरील 148 कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नत्या विना अनुदानित पदावर केलेल्या आहेत, ही बाब लक्षात घेता सकृतदर्शनी त्यांच्या सेवेत खंड पडला आहे. अशा कर्मचाऱ्यांनी विनाअनुदानित पदावर केलेली सेवा नियमित असल्याचे समजून सदरहू सेवाकालावधी निवृत्तीवेतन विषयक लाभासाठी पात्र ठरविण्यात यावा, यासाठी मान्यता दिली..
शासनाने सर्व अकृषि विद्यापीठांसाठी मंजूर केलेल्या पदांची बिंदुनामावली स्वतंत्र ठेवण्यात यावी. अशा अनुदानित पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या विद्यापीठाने विनाअनुदानित पदावर करू नयेत, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना भविष्यात उद्भवणार नाहीत असा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.