महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल; हॉटेल, मॉल आणि रेस्टॉरेंट राहणार 10 वाजेपर्यंत खुली - Hotels malls restrictions maharashtra

'मिशन बिगेन अगेन' अंतर्गत 15 ऑगस्टपासून हॉटेल्स, मॉल आणि रेस्टॉरेंट रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्यासंदर्भात बुधवारी, 11 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार उद्या 15 ऑगस्टपासून हॉटेल, मॉल आणि रेस्टॉरेंटला दहा वाजेपर्यंत खुले राहण्याची मुभा असणार आहे.

मंत्रालय
मंत्रालय

By

Published : Aug 14, 2021, 2:16 AM IST

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राज्य सरकार पावले उचलत आहे. 'मिशन बिगेन अगेन' अंतर्गत 15 ऑगस्टपासून हॉटेल्स, मॉल आणि रेस्टॉरेंट रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्यासंदर्भात बुधवारी, 11 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार उद्या 15 ऑगस्टपासून हॉटेल, मॉल आणि रेस्टॉरेंटला दहा वाजेपर्यंत खुले राहण्याची मुभा असणार आहे. यासोबतच आंतरराज्य प्रवास करण्यासाठी लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असणार आहे. किंवा 72 तास आधी केलेली आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे गरजेचे असणार आहे.

हेही वाचा -कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण : ईडीने माजी आमदार विवेक पाटील यांच्याविरोधात दाखल केले आरोपपत्र

हॉटेल, रेस्टॉरंट रात्री १० पर्यंत खुली

राज्यात 'मिशन बिगेन अगेन' अंतर्गत कोरोना निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले होते. अनेक जिल्ह्यांत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने पुन्हा निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार १५ ऑगस्टपासून निर्बंधातून सूट दिलेल्या सर्वांना नियमावली लागू होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल आणि रेस्टॉरेंटच्या वेळा ४ पर्यंत ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये बदल करून रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. हॉटेल व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हॉटेल आणि रेस्टॉरेंटच्या वेळा वाढवून द्याव्यात, अशी विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा दिल्याचे बोलले जाते.

मॉलमधील सर्व दुकान, शॉपमध्ये कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती राहणार असून केवळ २ लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये देखील ५० टक्के लोकांची उपस्थिती अनिवार्य असेल. दरम्यान, कोरोनाच्या त्रिसूत्री नियमाचे पालन करणे बंधनकारक असेल. जे हॉटेल नियम मोडतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारने सिनेमा, नाट्यगृह सुरु करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. राज्य सरकारने लग्न सोहळ्यासाठी ५० टक्के लोकांची उपस्थिती ठेवण्यास परवानगी दिली आहे. धार्मिक स्थळांबाबत सध्या निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

आंतरराज्य प्रवासासाठी लसीचे दोन डोस आवश्यक

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीनुसार आंतरराज्य प्रवास करण्यासाठी प्रवाशाकडे लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, डोस घेऊन 14 दिवस झालेले असावेत. त्यानंतरच आंतरराज्य प्रवास करता येणार आहे. किंवा त्या व्यक्तीकडे 72 तास आधीचे आरटी-पीसीआर टेस्ट केलेले निगेटिव्ह सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. यापैकी त्या व्यक्तीकडे काहीच आढळले नाही तर, त्या व्यक्तीला 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

प्रार्थनास्थळे, मंदिर बंद राहणार

मंदिरे व प्रार्थनास्थळे खुली करण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. मंदिरे व प्रार्थनास्थळे सध्या खुली करता येणार नसल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रेल्वेला मासिक, त्रैमासिक पासच्या सूचना

ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि दोन डोस घेऊन १५ दिवस झालेले आहेत, त्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. अशा नागरिकांना मासिक आणि त्रैमासिक पास देण्यात येणार आहे. मात्र, पासची वैधता पडताळणीबाबत रेल्वेला अधिकार देण्यात आले आहेत. पास ज्या दिवसापर्यंत असेल त्याच दिवसापर्यंत नागरिकांना प्रवास करता येणार आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 500 रुपयांचा दंड आणि रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा केली जाणार आहे.

खुल्या प्रांगणातील विवाह सोहळ्यांना २०० जणांच्या उपस्थितीची परवानगी दिली आहे. तर, बंद मंगल कार्यालयातील विवाह सोळ्यांना बैठक क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी असेल. इनडोअर खेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असून दोन डोसचा नियम त्यांना बंधनकारक राहील. तसेचत, खासगी कार्यालयांना २४ तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. कार्यालयात २५ टक्के क्षमतेने शिफ्ट्समध्ये कामाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे टोपे म्हणाले.

..तर पुन्हा लॉकडाऊन

तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून एकूण उत्पादित होणारे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन १ हजार ३०० मेट्रिक टन आहे. त्यामध्ये औद्योगिक क्षेत्राने आणखी २०० ते ३०० मेट्रिक टन वाढवू, अशा पद्धतीची खात्री दिली असून त्यापद्धतीने वाढ केली जात आहे. दरम्यान ४५० पीएसए प्लांटची ऑर्डर देण्यात आली आहे. यापैकी १४१ प्लांटची सुरुवात प्रत्यक्षात झाली आहे. म्हणजेच, ऑक्सिजन निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या काळात १ हजार ७०० ते २ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल. तर, ‘केंद्र शासनाने तिसऱ्या लाटेच्या संदर्भात सांगितले होते की, दुसऱ्या लाटेचा कालावधीत ऑक्सिजनचा जो पिक होता, त्याच्या दीडपटीपर्यंतची व्यवस्था करा, असे सूचित केल्याच्या कारणाने जवळ जवळ ३ हजार ८०० मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजन लागू शकणार आहे. पण, तिसऱ्या लाटेमध्ये ज्या दिवशी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन दररोज लागेल त्यावेळेस महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन ऑटोमोडमध्ये करण्यात येईल, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा -MH CORONA : रुग्णसंख्या वाढ सुरूच.. आज ६,६८६ नवे रुग्ण, १५८ जणांचा मृत्यू

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details