महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध आदेश लागू

कोविड -19 संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन उपाययोजनेअंतर्गत 5 एप्रिलला निर्बंध आदेश जारी केले आहेत. याअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही अटीसह सर्व प्रासंगिक सेवांसह सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध आदेश लागू
ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध आदेश लागू

By

Published : Apr 7, 2021, 8:32 PM IST

मुंबई - कोविड -19 संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन उपाययोजनेअंतर्गत 5 एप्रिलला निर्बंध आदेश जारी केले आहेत. याअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही अटीसह सर्व प्रासंगिक सेवांसह सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये विमानतळावर आवश्यक मालमत्तेची हाताळणी, तिकिटिंग इत्यादी अनुषंगिक सेवांचा समावेश आहे.

परवानगी असलेल्या उत्पादनांच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सर्व अनुषंगिक कामांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच उत्पादन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या तसेच तयार झालेले उत्पादन पाठविण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे, कार्यालयीन प्रक्रियेला सुद्धा परवानगीचा समावेश यामध्ये आहे.

कामगारांसाठी सर्व सुविधायुक्त क्वारंनटाईन सेंटर उभारावे-

पाचशेपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या उद्योगांनी आपल्या कामगारांसाठी सर्व सुविधायुक्त क्वारंनटाईन सेंटर उभारावे. ज्या उद्योगांनी अशी सुविधा आपल्या कॅम्पस बाहेर केली असेल. त्यांनी संक्रमित कर्मचाऱ्यास त्या ठिकाणी हलविताना तो कोणाच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.

कृषी क्षेत्राशी संबंधित इतर सेवा त्यावश्यक सेवांमध्ये-

कृषी विषयक कामे सुव्यवस्थित सुरू राहण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून सूचीबद्ध केलेल्या कृषी क्षेत्राशी संबंधित इतर सेवा ज्यामध्ये शेतीसाठी आवश्यक सुविधा, बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांची दुरुस्ती यांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आला आहे.


चिकन, पोल्ट्री, मटण, अंडी, मासे विक्रीची दुकाने यांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये-

चिकन, पोल्ट्री, मटण, अंडी, मासे विक्रीची दुकाने यांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करण्यात आला आहे. यात सेबीने मान्यता दिलेल्या बाजारातील मूलभूत सुविधा संस्था जसे की स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज, क्लियरिंग कॉर्पोरेशन इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थाचा समावेश आहे.

हेही वाचा-सचिन वाझेंचा नवा लेटर बॉम्ब.. पुन्हा पोलीस सेवेत घेण्यासाठी देशमुखांनी मागितले दोन कोटी !

ABOUT THE AUTHOR

...view details