महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेस-राष्ट्रवादीवर ढगफुटी.. सकाळपासून चार आमदारांचे राजीनामे, अजूनही काही पक्ष सोडण्याच्या तयारीत

हे चारही आमदार उद्या सकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासोबतच, ५७ नगरसेवकही उद्या भाजपात प्रवेश करतील.

By

Published : Jul 30, 2019, 1:11 PM IST

Updated : Jul 30, 2019, 3:09 PM IST

resignation of congress ncp mlas continues 3 mlas have resigned since morning

मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंपाचे धक्के सुरु आहेत. मोठमोठे नेते या पक्षांमधून राजीनामे देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या तीन आणि काँग्रेसच्या एका नेत्याने आपले राजीनामे अध्यक्षांकडे सुपूर्द केले.

राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी आपला राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द केला
राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी आपला राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द केला
काँग्रेसचे आमदार कालिदास कोलंबकर यांनी आपला राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द केला

आज सकाळीच राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राजीनामा दिला होता. तर, आता राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड, आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोलंबकर यांनीही आपापले राजीनामे अध्यक्षांकडे दिले.

हे चारही आमदार उद्या सकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासोबतच, ५७ नगरसेवकही उद्या भाजपात प्रवेश करतील.

ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर, काँग्रेस-राष्ट्रवादीमधील 'आऊटगोईंग' आणि भाजपमधील 'इनकमिंग' पाहता, येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला कोणी विरोधक उरतोय की नाही? अशी चर्चा राज्यामध्ये होते आहे.

Last Updated : Jul 30, 2019, 3:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details