मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटने समवेत बैठक घेऊन त्यांच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला. या निर्णयाप्रमाणे शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालये, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकाला १ लाख २१ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
हेही वाचा -इम्तियाज खत्रीला पुन्हा सोमवारी हजर होण्याचे एनसीबीचे समन्स; तर आणखी एका ड्रग पेडलरला अटक
तातडीने हा शासन निर्णय काढल्याबद्दल सेंट्रल मार्डतर्फे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. गेल्या आठवड्यात आपल्या विविध मागण्यांसाठी मार्डच्या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्डच्या डॉक्टरांसोबत बैठक घेऊन त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मार्डच्या डॉक्टरांकडून आंदोलन मागे घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर डॉक्टरांना 1 लाख 20 हजार रुपये देण्यात येणार आहे.
हेही वाचा -Cruise ship drugs case : नवाब मलिकांविरोधात 100 कोटींचा दावा ठोकणार - मोहित कम्बोज