मुंबई -मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ( Reserved ward announced for BMC Election ) कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक ( BMC Election ward ) घेण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यानुसार आज बांद्रा रंगशारदा सभागृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच महिला आरक्षित प्रभाग आरक्षण लॉटरी ( Ward reservation BMC news ) काढण्यात आली. आज कोणते प्रभाग आरक्षित ( BMC Election news reserved ward ), तर कोणते प्रभाग खुले हे स्पष्ट झाल्याने राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागण्यास मोकळे झाले आहेत. तर अनेकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना पुढील पाच वर्षे नगरसेवक पदापासून लांब राहावे लागणार आहे किंवा घरातील महिला किंवा पुरुष उमेदवाराला निवडणुकीसाठी उभे करावे लागणार आहेत.
हेही वाचा -नोटाबंदीचे धोरण चुकलेच, रिझर्व बँकेच्या हवाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आरोप
असे असेल आरक्षण - मुंबई महानगरपालिकेचे 227 प्रभाग होते. लोकसंख्येत वाढ झाल्याने राज्य सरकारने 9 प्रभागांची वाढ करून 236 प्रभाग केले आहेत. प्रभाग रचना मंजूर झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक आयोगाने ओबीसी वगळता निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज (31 मे ला) सकाळी 11 वाजता बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी, पालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंग चहल यांच्या उपस्थितीत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण लॉटरी काढण्यात आली.
सुरुवातीला अनुसूचित जातीच्या 15, अनुसूचित जमातीच्या 2 प्रभागांची निश्चिती करण्यात आली. त्यामधून अनुसूचित जातीच्या 8 आणि अनुसूचित जमातीच्या 1 महिला प्रभागासाठी लॉटरी काढण्यात आली. उर्वरित प्रभागांमधून 109 महिला प्रभाग आरक्षित करताना जे प्रभाग आरक्षित झाले नव्हते असे प्राधान्य क्रम लावून 86 प्रभाग आरक्षित करण्यात आले. तरस, 23 प्रभागासाठी लॉटरी काढण्यात आली. आरक्षित प्रभागांच्या सोडतीनंतर त्यावर 6 जूनपर्यंत सूचना व हरकती मागवण्यात येणार आहेत. 13 जूनला अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.
काय आहे आरक्षणाचा नियम -२००७, २०१२, २०१७ मध्ये जे प्रभाग आरक्षित होते ते खुले करण्यात आले आहेत. तर, गेल्या दोन ते तीन निवडणुकीत जे प्रभाग आरक्षित झाले नव्हते ते प्रभाग अनुसूचित जाती, जमातीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तर, जे प्रभाग गेल्या तीन निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित झाले नव्हते त्याला प्राधान्य क्रमांक १ नुसार ५३ प्रभाग व २ नुसार महिला ३३ प्रभाग आरक्षित करण्यात आले. तर, जे प्रभाग मागील २०१२ व २०१७ च्या निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित नव्हते, अशा ६३ प्रभागातून प्राधान्य क्रमांक ३, २३ प्रभागांसाठी सोडत काढण्यात आली.
आरक्षित प्रभाग -
अनुसूचित जातीसाठी राखीव १५ प्रभाग निश्चित -
६०, ८५, १०७, ११९, १३९, १५३, १५७, १६२, १६५, १९०, १९४, २०४, २०८, २१५, २२१