मुंबई -मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या घराबाहेर एका चारचाकीत स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर माजी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून ( National Investigation Agency ) अटक करण्यात आली होती. सचिन वाझे यांच्यावर अनेक कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामधील यूएपीए ( Unlawful Activities Prevention Act ) हा कलम दहशतवादी कारवायाशी संबंधित असलेले कलम असून ते रद्द करण्यात यावे. यासाठी सचिन वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) आज ( दि. २४ जानेवारी ) धाव घेतली आहे.
कोणत्या कलमाखाली गुन्हे..? -या आरोपपत्रामध्ये आरोपींविरुद्ध भा.दं.वि.चे कलम १२०(ब), २०१, २८६, ३०२, ३६४, ३८४, ३८६, ४०३, ४१९, ४६५ तसेच भा.दं.वि. ४७१, ४७३ आणि ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहेत. याचबरोबर शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ आणि २५ नुसार व स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम ४, १६, १८ व २० UA(p)A अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत.