महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

water suply: दादर जलवाहिनीची दुरुस्ती वेळेत पूर्ण, पाणी पुरवठा सुरळीत - Parsi Gymkhana

दादर (Dadar) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पारसी जिमखाना समोरील जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. शनिवारी सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत झाला.

मुंबई पालिका
मुंबई पालिका

By

Published : Jul 9, 2022, 1:09 PM IST

मुंबई: दादर पूर्व मधील पारसी जिमखाना समोरील १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास फुटली होती. जलवाहिनी दुरुस्तीसाठी दोन दिवसाचा कालावधी लागला. शनिवारी सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत (water supply) करण्यात आला.

याभागात होणार सुरळीत पाणीपुरवठा:पालिकेच्या जल अभियंता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी युद्धपातळीवर काम करत जल वाहिनीची दुरुस्ती केल्याने, दादर पूर्व (Dadar East), माटुंगा, वडाळा, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी, दादर, नायगाव, लालबाग, वडाळा, परळ, काळाचौकी, शिवडी भागातील पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.

जलवाहिनी फुटल्याने ओढावली परिस्थिती: जलवाहिनी जुनी झाल्याने फटून गळती लागली होती. ही बाब निदर्शनास येताच महापालिकेच्या वतीने दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details