मुंबई - कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाचे 48 वर्षीय मेहूणे जेसन सॅव्हियो वॅटकिन्स यांनी मुंबईतील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसेच त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचंही मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Remo Dsouza Brother In Law Suicide : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाच्या मेहूण्याची आत्महत्या; कारण अस्पष्ट - undefined
कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाचे 48 वर्षीय मेहूणे जेसन सॅव्हियो वॅटकिन्स ( Remo Dsouza Brother In Law Suicide ) यांनी मुंबईतील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसेच त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
जेसन हा रेमोची पत्नी लिझेल हिचा भाऊ होता. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यमुना नगर येथील फ्लॅटमध्ये त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली होती. त्याने राहत्या घरी गळफास घेतला होता. त्याला कुपर रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी घरी कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.