मुंबई : -केवळ हिंदूंच्या (Hindu festival) विविध सणांच्यावेळी 'किती ध्वनीप्रदूषण होते' याचे अनेक अहवाल (Maharashtra Pollution Control Board) प्रदूषण मंडळ दरवर्षी प्रकाशित करते. मात्र वर्षातील 365 दिवस मशिदीवरून भोंग्याद्वारे, तसेच मुसलमानांच्या अन्य सणांच्या वेळी होणाऱ्या प्रदूषणाविषयी एकही अहवाल प्रकाशित केला जात नाही. हा शासनाकडून हिंदूवर केला जाणारा धार्मिक पक्षपातच आहे. 'सेक्युलर' शासनाच्या या धार्मिक पक्षपाताचा (Religious bias by Maharashtra Pollution Control Board) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा निषेध करत; संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी (Hindu Janajagruti Samiti) हिंदु जनजागृती समिती (Allegation of Hindu Janajagruti Samiti) द्वारे करण्यात आली आहे.
प्रतिक्रीया व्यक्त करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हिंदूंच्या मंडळांवर सर्वाधिक खटले दाखल :2015 ते 2021 या 7 वर्षांच्या कालावधीत ध्वनीप्रदूषणाबाबत ' महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने हिंदूंच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर 230 खटले दाखल केले आहेत. तर मुसलमानांवर केवळ 22 खटले दाखल आहेत, अशी माहिती अधिकारातून उघड झाली आहे. अशा प्रकारे पक्षपाती कारवाई करून केवळ हिंदूंना बदनाम करणाऱ्या, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा'च्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करावे. अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाडये यांनी केली. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 'मुंबई मराठी पत्रकार संघात' आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा समन्वयक सागर चोपदार, तसेच समितीच्या 'सुराज्य अभियाना' च्या वतीने अभिषेक मुस्कटे हे उपस्थित होते.
230 खटले हे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी मंडळांवर :2015 ते 2021 या 7 वर्षांत महाराष्ट्रातील ध्वनीप्रदूषणाविषयी एकूण 252 खटले दाखल झाल्याची माहिती, आम्हाला माहितीच्या अधिकारात मिळाली. यातील 230 खटले हे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी उत्सव साजरे करणारी मंडळे, संघटना अथवा कार्यकर्ते यांच्यावरच झालेले दिसतात. मुळात दिवसांतून पाचवेळा मशिदीवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांनी जोरदार आवाज उठवला आहे; मात्र या ध्वनीप्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेले दिसून येते. गणेशोत्सव आली की, प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्यातील 27 जिल्ह्यांतील 256 ठिकाणी 'ध्वनीमापन यंत्र घेऊन' ध्वनीप्रदूषण किती झाले’ ते मोजतात. तसेच 'वायू आणि जल प्रदूषण' किती झाले, तेही मोजतात. राज्यभरात दिवाळीच्या कालावधीत ध्वनी आणि वायू याचे दर तासाला निरीक्षण नोंदवले जाते. दरवर्षी याचा अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून मंडळाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात येतो. वर्ष 2015 पासून असे अहवाल उपलब्ध आहेत, असे खाडये यांनी सांगितले.
अनधिकृत भोंग्यांवर कारवाई का नाही :शासन जर 'सेक्युलर' आहे, तर वर्षभर प्रतिदिन मशिदीवरील भोंग्यांद्वारे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचे सर्वेक्षण मंडळ का करत नाही? बकरी ईदला प्राणी हत्येमुळे होणाऱ्या जलप्रदूषणाचे निरिक्षण का नोंदवत नाही? त्याचे अहवाल का तयार केले जात नाहीत? मध्यंतरी राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतल्यावर, मुंबईतील जवळपास 843 हून अधिक मशिदींवरील भोंग्यांना अनुमती देण्यात आल्याची माहिती आहे. याचा अर्थ हे भोंगे यापूर्वी अनधिकृत होते. मग या भोंग्यांविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही? असे प्रश्न खाडये यांनी उपस्थित केले आहेत.
हेही वाचा :Elephant Ate Jackfruit : काय सांगताय काय...? चक्क 30 फूट उंचीवरील फणस हत्तीने खाल्ला!