महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तौक्ते चक्रीवादळ : पंचनामे सुरू, समाधानकारक मदत करणार - मंत्री वडेट्टीवार - cyclone Tauktae affect news

निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे तौक्ते चक्रीवादळानेही मोठे नुकसान केले आहे. वीज खूप ठिकाणी गेली होती. २९ हजार घरांची पडझड झाली आहे. बागायती पंचनामे सुरू असून, ते चार पाच दिवसात पूर्ण होतील. तसेच समाधान देणारी मदत केली जाईल, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Minister Vijay Wadettiwar
विजय वड्डेटीवार

By

Published : May 24, 2021, 3:09 PM IST

Updated : May 24, 2021, 5:25 PM IST

मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान जास्त झाले आहे. त्यामुळे शेतीचे पंचनामे थोडे उशीरा होत आहेत. शेतीचे पंचनामे पूर्ण झाले की मदतीचा निकषाबाबत कॅबिनेट बैठकीत अंतिम निर्णय घेवू, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिली आहे.

हेही वाचा -बार्ज पी-305 दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला 70 वर

निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे तौक्ते चक्रीवादळानेही मोठे नुकसान केले आहे. वीज खूप ठिकाणी गेली होती. २९ हजार घरांची पडझड झाली आहे. बागायती पंचनामे सुरू असून, ते चार पाच दिवसात पूर्ण होतील. तसेच समाधान देणारी मदत केली जाईल, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. समुद्र किनारी भागात नुकसान पुन्हा होऊ नये यासाठी कायमस्वरूपी काम करावे लागणार आहे. त्यासाठी वेगळे पुनर्वसन धोरण केले जाईल व त्याचा मसुदा कॅबिनेट बैठकीत चर्चेला ठेवण्यात येईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

वड्डेटीवार यांची दरेकर यांच्यावर टीका

दरेकर यांनी उपोषण हे केंद्र सरकारच्या विरोधात करावे, या आधी केंद्र सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप मिळाली नाही. टीकाटीपण्णी करण्यापेक्षा कोकणी लोकांना मदत करावी, असे वडेट्टीवार म्हणाले.

लॉकडाऊन शिथील करण्याबाबतचा निर्णय पुढील पाच दिवसात

लॉकडाऊन शिथील करावे का? यावर वड्डेटीवार म्हणाले की, जीवनमरणाचा प्रश्न आहे, त्यामुळे लॉकडाऊन शिथील करावे ही मागणी होत आहे. पुढील पाच दिवस परिस्थिती बघू आणि त्यानंतर निर्णय घेवू. १४ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे सगळे नियम शिथील करणे शक्य नाही. हॉटस्पॉट तिथे कडक नियम राहीले पाहिजे ही भूमिका आहे. तसेच रुग्ण संख्या कमी तिथे लॉकडाऊनचे नियम शिथील करावे असे माझे मत असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

हेही वाचा -'बार्ज'वरील ८ कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले गुजरातच्या वलसाड किनाऱ्यावर

Last Updated : May 24, 2021, 5:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details