मुंबई -शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलनापूर्वी घराची रेकी करण्यात ( Sharad Pawar residence Reiki before attack ) आली होती. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज हे मुंबई पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्व आंदोलक कर्मचाऱ्यांचे मोबाईल मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
रेकीचे सीसीटीव्ही फुटेज सापडले - शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिलव्हर ओक ( silver oak Reiki disclosure from CCTV ) या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक, चप्पलफेक करुन आंदोलन केले. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र या आंदोलनापूर्वी आंदोलकांनी शरद पवार यांच्या घराची रेकी केल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ हा मुंबई पोलिसांना मिळाला आहे.
गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक घरावर 8 एप्रिलला एसटी कर्मचाऱयांनी आंदोलन करत हल्ला केला होता. याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११० आरोपीना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होता. न्यायमूर्ती सावंत यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. शरद पवार ( Sharad Pawar House Protest ) यांच्या घरावर झालेल्या आंदोलनाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte Police Custody ) यांना 11 एप्रिल म्हणजेच दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. किला कोर्टात याबाबत सुनावली झाली.
हेही वाचा -Gunaratna Sadavarte Police Custody : गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी, 109 कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी
हेही वाचा -Silver Oak Attack Report : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे.. गृहमंत्र्यांनी घेतली भेट