मुंबई -शहरासह उपनगरातील वन जमिनींवरील आदिवासी पाड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करावे, असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.
दहिसर, बोरिवली व कांदिवली पूर्व भागात वन जमिनींवर जानू पाडा, पांडे कंपाऊंड, वैभव नगर, केतकी पाडा, धारखाडी, नऊगड, दामू नगर, रामगड व गौतमनगर तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडे वसले आहेत. या पाड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वीज, पाणी यासारख्या मूलभूत नागरी सुविधा देखील नागरिकांना मिळत नाहीत. या सर्वांचे पुनवर्सन वन जमिनींच्या बॉर्डरवरील एस.आर.ए. योजनेत करावे, अशा प्रकारचा प्रस्ताव सरकारपुढे ठेऊन सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केली होती.