मुंबई - 2008 मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भात गेल्या 12 वर्षांपासून विशेष न्यायालयामध्ये खटला प्रलंबित असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या संदर्भात 3 डिसेंबार 2020 पासून नियमित सुनावणी सुरू होत आहे. या नियमित सुनावणीसाठी या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर दिवेदी, अजय राहीलकर व संदीप डांगे यांना अटक करण्यात आली होती. 3 डिसेंबरला सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याने विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना आता 19 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.
475 साक्षीदार पैकी तीनशे साक्षीदारांची साक्ष अजूनही बाकी
या प्रकरणातील आणखी एक आरोपी समीर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून या खटल्याला होत असलेल्या विलंबाबद्दल उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, म्हणून मागणी केली होती. त्यानुसार विशेष न्यायालयाने या संदर्भात नियमित सुनावणी डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. एनआयए न्यायालयात गेल्या 6 महिन्यात केवळ 14 जणांची साक्ष नोंदवण्यात आली असून या प्रकरणी 475 साक्षीदार आहेत. अजूनही 300 साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी असल्यामुळे या संदर्भात न्यायालयाकडून नियमित सुनावणी सुरू होत असून या प्रकरणातील सर्व आरोपींना सुनावणीच्या वेळेस न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
हेही वाचा -भिवंडीत कत्तलीसाठी गायी नेणारे वाहन पकडले; 5 जणांविरुद्द गुन्हा दाखल
सर्व साक्षीदार तपासणे हे किचकट काम