मुंबई -राज्यात पुढील 5 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथे अतिवृष्टीचा होईल, असा प्रादेशिक हवामान विभागाने इशारा दिला आहे. तसेच मुंबई व ठाणे येथे पावसाची संततधार असेल. येथील काही परिसरात अतिवृष्टी होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच 17 ऑगस्टला गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उपग्रहाने पाठविलेल्या छायाचित्रांनुसार पुढील 24 तासात राज्यात मुसळधार व अतिवृष्टी पाऊस होणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. कोकण, घाट विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यावर ढग दाटून आले आहेत. यामुळे मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाने अंदाज केला आहे.
असा आहे 24 ऑगस्टपर्यंत हवामानाचा अंदाज
18 ते 19 ऑगस्टः कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
20 ते 21 ऑगस्ट: गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे
अतिवृष्टीचा इशारा
17 ऑगस्ट:राज्य महाराष्ट्राय घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदा पावसासहित अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
18 ऑगस्टःकोकण,गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
19 ऑगस्टः या दिवशी 18 ऑगस्टप्रमाणेच हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
20 ऑगस्ट:विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
21 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.