मुंबई -मुंबई क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीने आर्यन आणि इतर आरोपींची सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. त्यानंतर त्यांना जेवणात एनसीबी कार्यालयाजवळच्या रस्त्यावरची तसेच रेस्टरन्टमधील पुरी भाजी पराठा दाल राईस बिर्याणी देण्यात आली.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर शनिवारी रात्री एनसीबीची धाड पडल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आतापर्यंत अकरा जणांना अटक झाली आहे. आर्यन खानला न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. किंग खान आणि उद्योग पतीची मुलेजी रोज 5 स्टार आणि मोठ्या हॉटेलमध्ये जेवतात. आता त्यांना एनसीबी कस्टडीत एनसीबी कार्यालयाजवळच्या रस्त्यावरची तसेच रेस्टरन्टमधील पुरी भाजी पराठा दाल राईस बिर्याणी देण्यात आली. मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून कुटुंबीय मॅकडॉनल्डचा बर्गर घेऊन गेल्याचे पाहायला मिळाले. मात्र, पोलिसांनी त्यांच्या कुटूंबियांना अडवले आहे. कालही किल्ला कोर्टात अरबाझ मर्चंटचे वडिलांनी अरबाझसाठी घरचे जेवण आणले होते. तेव्हा त्यांनी आर्यनलाही विचारले की, तुला घरचं जेवण आणून देऊ का? त्यावर आर्यनने नको थँक्स असं उत्तर अरबाजच्या वडिलांना दिले. त्यानंतर त्यांनी अरबाजला जेवण दिले. तो कॉरिडॉरमध्ये बसून खात होता. मात्र, शाहरूखच्या मुलाने म्हणजेच आर्यनने घरी तयार केलेले जेवण नाकारले आहे.
7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी-