मुंबईराज्याचे शालेय शिक्षण मंत्री (education minister) दीपक केसरकर (dipak kesarkar) यांनी पद स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत निर्णय जाहिर केला होता. आता याबाबत, परीक्षा पद्धती सुधारत (change exam system) विद्यार्थ्यांवरील ताण कमी (reduce stress over students) करा. अशी देखील मागणी जोर धरताना दिसत आहे. शिक्षणतज्ज्ञांसह (educationists) पालकांनी हि मागणी उचलून धरली आहे. याबाबत, पालक, शिक्षक आणि शिक्षण तज्ञ यांनी निरनिराळी मते व्यक्त केलेली आहे. जाणून घेवूया सविस्तर,
किमतींचा भार आमच्या माथी नको पालकांची मागणीराज्यात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत सुमारे २ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १ लाख ४ हजार एकूण शाळा आहेत. ६६ हजार सरकारी शाळा आणि ३७ हजार खाजगी शाळा राज्यात आहेत. सुमारे ६ लाख शिक्षक राज्यात कार्यरत आहेत. त्यामुळे ह्या निर्णयाचे दूरगामी परिणाम ह्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि त्यांच्या पालकांवर होणार आहे. पालकांना दप्तराचे ओझे कमी व्हावे असे मनापासून वाटते. याबाबत पालक तेजस्विनी गोणी यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले कि, ''दप्तराचे ओझे कमी करण्याचा विचार चांगला आहे. त्याचे स्वागत आहे. मात्र मूळ रोगावर इलाज करायला हवा. सरकारने परीक्षा पद्धती बदलावी, अभ्यासक्रम बदलावा जेणेकरुन पालकांच्या आणि पाल्यांच्या मनावरील ताण दूर होईल. तसेच पुस्तकाचे तीन भाग होणार म्हणजे पुस्तक आणि वह्या आणखी महाग होणार. शासनाचा इलाज तर दूर उलट महागड्या किमतींची पुस्तके वह्या आम्हाला घ्याव्या लागतील. आमच्या माथी कशाला उगीच हा खर्च टाकता? ''
दप्तराच्या ओझ्याचा त्रास मोठाईटीव्हीने विद्यार्थ्यांचे मत जाणून घेतले. गार्गी गोणी हि मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकते तिने सांगितले,'' माझ्या दप्तराचे ओझे ७ किलो आहे. माझी पाठ दुखते. जर दप्तराचे ओझे कमी झाले तर खूप बरे होईल. तर आझाद या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सांगितले कि, ''माझ्या पाठीला दप्तरामुळे त्रास होतो. जर शाळेतच काही वह्या पुस्तके ठेवली तर आणि खूप होमवर्क नाही दिला तर आम्हाला छान वाटतं.''