महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेत कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना मिळणार संधी - कोरोना वॉरिअर्सना डॉक्टरांच्या नेमणुकीत प्राध्यान्य

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात डीएनबी शिक्षक ग्रेड १ आणि २ यासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टरांना संधी देण्यात यावी. तसेच वरिष्ठ डॉक्टरांची वयोमर्यदा ६२ वरून ६५ करण्याचा घाट घातला जात आहे.

Mumbai Municipal Corporation
मुंबई महानगरपालिका

By

Published : Dec 16, 2020, 8:56 PM IST

Updated : Dec 16, 2020, 9:14 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात डीएनबी शिक्षक ग्रेड १ आणि २ यासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टरांना संधी देण्यात यावी. तसेच वरिष्ठ डॉक्टरांची वयोमर्यदा ६२ वरून ६५ करण्याचा घाट घातला जात आहे. या डॉक्टरांची वयोमर्यादा वाढवू नये, अशा मागण्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केल्या. यावर कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले.

..या पदांसाठी भरती -

मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला व वांद्रे येथील भाभा रुग्णालय, व्ही. एन. देसाई रुग्णालय, कांदिवली येथील आंबेडकर हॉस्पिटल, एम एम एम सेन्टेनरी, राजावाडी आदी रुग्णालयात मेडिसीन, सर्जरी, पेडिएट्रिक, ऍनेस्थिया, रेडिओलॉजी, नाक कान घसा, पॅथॉलॉजी आदी पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी ग्रेड १ साठी २ लाख रुपये तर ग्रेड २ साठी दीड लाख रुपये इतके मानधन दिले जाणार आहे. याबाबतची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा मांडला. यावर बोलताना पालिका बाहेरून येणाऱ्या डॉक्टरांना दीड ते दोन लाख रुपये मानधन देणार आहे. त्याचवेळी पालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना १ लाख २० हजार रुपये इतकाच पगार दिला जातो. जास्त पगार मिळतो म्हणून पालिका रुग्णालयातील डॉक्टर आपल्या नोकऱ्या सोडून या पदासाठी अर्ज करतील. अशाने पालिकेच्या केईएम, रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता भासणार आहे. डॉक्टरांची कमतरता भासू नये म्हणून कोरोना काळात ज्या डॉक्टरांनी रुग्णांची चांगली सेवा केली आहे अशा डॉक्टरांना या पदावर सामावून घ्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली.

माहिती देताना मुंबई महापालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत
नगरसेवकांच्या मागण्या -
शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी पालिकेचा कारभार म्हणजे आंधळा दळतोय आणि कुत्रे पीठ खातंय असे म्हणून प्रशानाला चांगलेच धारेवर धरले. पालिका प्रशासनाने अशी जाहिरात रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली. कोविड काळात काम केलेल्या परिचारिका आणि डॉकटरांना पालिकेच्या सेवेत प्रशासनाने प्राधान्याने सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी पालिकेचा कोणताही निर्णय घेताना नगरसेवक आणि गटनेत्यांना विश्वासात घेतले जात नाही. पालिका आयुक्तांची ही पद्धत चुकीची आहे. पालिकेच्या निर्णयात गटनेत्यांना विश्वासात घेतले पाहिजे, पालिकेच्या मदतीला आलेल्या डॉक्टरांना आणि परिचारिकांना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली. सर्वच पक्षाच्या सदस्यांच्या मागणीनुसार कोविड काळात कोरोना योध्यांनी चांगले काम केले आहे. त्यांना कोविड योध्दा म्हणून गौरविले आहे. त्यांना पालिका सेवेत सामावून घेतल्यास त्यांचा खरा गौरव होईल, असे सांगत त्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
डॉक्टरांची वयोमर्यदा वाढवू नका -

डॉक्टरांच्या निवृत्ती वय ५८ वर्ष इतके होते. त्यात बदल करून ते ६० आणि नंतर ६२ वर्ष करण्यात आले. आता काही डॉक्टर हे वय ६५ वर्ष करण्याचा घाट घालत आहेत. त्यासाठी बैठक घेतल्या जात आहेत. अशी माहिती मला मिळाली आहे. काही मोजके डॉक्टर एकाच पदावर राहणार असतील तर इतर कनिष्ठ डॉक्टरांना वरिष्ठ डॉक्टर बनण्याची संधी मिळणार नाही. हा त्या कनिष्ठ डॉक्टरांवर अन्याय आहे. यासाठी पालिकेने डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६२ वर्षे आहे त्यात बदल करू नये अशी मागणी विशाखा राऊत यांनी केली. कोरोना काळात ५० वर्षाहून अधिक वय असलेल्या नागरिकांना धोका असल्याने घरी राहण्याचा सल्ला दिला जातो. मग ज्या डॉक्टरांचे वय झाले आहे, त्यांना वरिष्ठ पदावर नियुक्त करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Last Updated : Dec 16, 2020, 9:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details