महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भिवंडी रोड स्थानकावरून 18 हजारांहून अधिक पार्सलची विक्रमी वाहतूक - 18 हजारांहून अधिक पार्सल

सप्टेंबर २०२० ते जुलै २०२१ पर्यंत भिवंडी रोड स्टेशनवरून १८ हजार ८६७ टन वजनाचे एकूण १३.३७ लाख पॅकेजेस पाठवण्यात आले आहेत. ज्यात फर्निचर, रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, खाद्यान्न, औषधे, प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या, स्टेशनरी, वंगण लोकप्रिय ब्रँडचे तेल आणि सौंदर्यप्रसाधने यांचा समावेश आहे.

भिवंडी रोड
भिवंडी रोड

By

Published : Aug 22, 2021, 8:15 PM IST

मुंबई -मध्य रेल्वेच्या भिवंडी रोड स्थानकावरून संपूर्ण देशभरात मागील दहा महिन्यात तब्बल 18 हजार 867 टन वजनाचे एकूण 13.37 लाख पॅकेजेस पाठविण्याच्या विक्रम केला आहे. भिवंडी रोड परिसरात ऑनलाइन शाॅपिंग वेबसाईटचे मोठ्या प्रमाणात गोदामाचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे देशभरातील सामग्री रेल्वेने भिंवडी रोड येथून येते आणि येथूनच देशभरात रेल्वेने पाठविली जाते.


स्वस्तात आणि वेगवान वाहतूकीला चालना

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात भिवंडी रोड स्थानकात सर्वात यशस्वी व्यवसाय विकास युनिट (BDU) म्हणून उदयास आले आहे. १० सप्टेंबर २०२० रोजी पहिल्या पार्सल ट्रेनने ३ हजार ८७९ पॅकेजेसमध्ये ८६.८५ टन पार्सल पाठवल्यापासून शालीमार, आजरा (गुवाहाटी), पाटणा आणि इतर ठिकाणी १८ हजार ८६७ टन पार्सल पाठवण्यासह आजपर्यंतच्या भिवंडी रोड बिझनेस डेव्हलपमेंट युनिट महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे पार्सल वाहतुक स्वस्तात आणि वेगवान होत आहे.

सर्वात जास्त वाहतूक शालीमारमध्ये

सप्टेंबर २०२० ते जुलै २०२१ पर्यंत भिवंडी रोड स्टेशनवरून १८ हजार ८६७ टन वजनाचे एकूण १३.३७ लाख पॅकेजेस पाठवण्यात आले आहेत. ज्यात फर्निचर, रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, खाद्यान्न, औषधे, प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या, स्टेशनरी, वंगण लोकप्रिय ब्रँडचे तेल आणि सौंदर्यप्रसाधने यांचा समावेश आहे. सर्वात जास्त शालीमार येथे ८,७३०.६८ टन पार्सल पाठविण्यात आले आहे. त्यानंतर ८,०७२.४६ टन पार्सल आजरा (गुवाहाटी) आणि १,६३५ टन पार्सल दानापूर (पाटणा) यांतून मध्य रेल्वेला १०.८० कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

हेही वाचा -सांत्वनासाठी जिवंत जवानाच्याच घरी पोहोचले केंद्रीय मंत्री, वाचा पुढे काय झाले...

ABOUT THE AUTHOR

...view details