मुंबई - अवघ्या दोन वर्षाच्या आरव कदम या चिमुरड्याने ए टू झेड इंग्रजी मुळाक्षरे न चुकता कोणाचीही मदत न घेता क्रमाने अचूकपणे लावली. त्याच्या या प्रतिभेची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
मुंबईतल्या दोन वर्षीय आरव कदमची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद - 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'
लहान मुलाने ए टू झेड इंग्रजी मुळाक्षरे न चुकता कोणाचीही मदत न घेता क्रमाने अचूकपणे लावली. त्याच्या या प्रतिभेची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. आरव कदम असे या दोन वर्षाच्या मुलाचे नाव आहे.
आरव कदम हा मुंबईतील काळाचौकी 33 नंबर बिल्डिंग शिवडी येथे राहतो. दोन वर्षाचा आरव कदम हा खेळण्या-बागडण्याच्या वयात त्याने आपल्या बुद्धिचातुर्याने साऱ्यांना अचंबित केले आहे. नकळत्या वयातील त्याची पाठांतर अक्षरे व अंकाची समज थक्क करून सोडणारी आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयातील त्याची ही किमया अनाकलनीय आहे. लिटिल अल्फाबेट विझार्ड या उपाधीने त्याचा नुकताच २४ मे ला सन्मान करण्यात आलेला आहे. आरवचा जन्म १६ मे २०१७ ला झाला. आरव दीड वर्षाचा असताना घरच्यांनी त्याला इंग्रजी मुळाक्षरांचा संच आणून दिला. या संचातील मुळाक्षरे कोणाचीही मदत न घेता आरवने अचूक जोडली. केवळ एकदा सांगितलेली गोष्ट तो नीट लक्षात ठेवतो. आरवची एकाग्रता ही खूप आहे.
एखादी गोष्ट करताना तो ती मन लावून करतो. ही अक्षरे योग्य क्रमाने लावण्यासोबत तो ती न चुकता बोलून दाखवतो. या अक्षराप्रमाणे अंकांचीही ओळख त्याला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने आरावच्या प्रतिभेची घेतलेली दखल त्यांच्यासाठी प्रोत्साहनकारक असल्याचे मत आरवच्या पालकांनी व्यक्त केले आहे. पुढेही आरव असेच आपल्या बुद्धीच्या जोरावर नवीन विक्रम करील असे त्याचा आई व वडिलांना वाटत आहे.