महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई कोरोना अपडेट : चार महिन्यातील सर्वात कमी रुग्णांची नोंद, सोमवारी 529 नवे रुग्ण - मुंबई कोरोना

मुंबईत आज 529 नवे रुग्ण आढळून आले आहेत. फेब्रुवारीनंतर गेल्या चार महिन्यातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद आहे. आज 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 725 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून तो 672 दिवसांवर पोहचला आहे.

mumbai corona
mumbai corona

By

Published : Jun 14, 2021, 9:41 PM IST

मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज 529 नवे रुग्ण आढळून आले आहेत. फेब्रुवारीनंतर गेल्या चार महिन्यातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद आहे. आज 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 725 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून तो 672 दिवसांवर पोहचला आहे.


15 हजार 550 सक्रिय रुग्ण, मुंबईत आज 529 रुग्ण -


आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 17 हजार 108 वर पोहचला आहे. आज 19 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 202 वर पोहचला आहे. आज 725 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 84 हजार 107 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 15 हजार 550 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 672 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 21 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 77 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 20 हजार 133 तर आतापर्यंत एकूण 66 लाख 40 हजार 641 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -
1 मे ला 3908, 2 मे ला 3672, 3 मे ला 2662, 4 मे ला 2554, 5 मे ला 3879, 6 मे ला 3056, 7 मे ला 3039, 8 मे ला 2678, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 11 मे ला 1717, 12 मे ला 2116, 13 मे ला 1946, 14 मे ला 1657, 15 मे ला 1447, 16 मे ला 1544, 17 मे ला 1240, 18 मे ला 953, 19 मे ला 1350, 20 मे ला 1425, 21 मे ला 1416, 22 मे ला 1299, 23 मे ला 1431, 24 मे ला 1057, 25 मे ला 1037, 26 मे ला 1362, 27 मे ला 1266, 28 मे ला 929, 29 मे ला 1048, 30 मे ला 1066, 31 मे ला 676, 1 जून ला 831, 2 जूनला 925, 3 जून ला 961, 4 जून ला 973, 5 जून ला 866, 6 जून ला 794, 7 जून ला 728, 8 जून ला 673, 9 जून ला 788, 10 जून ला 660, 11 जून ला 696, 12 जून ला 733, 13 जून ला 700, 14 जून ला 529 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details