महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डिसेंबरमध्ये विक्रमी जीएसटी संकलन...जाणून घ्या तज्ञांचे मत - GST 2020 record

सरकारने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत एकूण 87 लाख जीएसटीआर-3 बी रिटर्न्स दाखल झाले आहेत. आयजीएसटी पैकी सीजीएसटी म्हणून सरकारने 23,276 कोटी रुपये नियमित सेटलमेंट म्हणून तर 17,681 कोटी रुपये एसजीएसटी म्हणून सेटल केले आहेत.

Record highest GST collection in December
डिसेंबरमध्ये विक्रमी जीएसटी संकलन...जाणून घ्या तज्ञांचे मत

By

Published : Jan 6, 2021, 12:31 AM IST

मुंबई -कोरोनामुळे यंदाचे वर्ष गाजले. मात्र, वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिन्यात एकूण 1,15,174 कोटी वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन झाले आहे. जीएसटीचे हे आतापर्यंतचे विक्रमी संकलन आहे. डिसेंबरमध्ये एसजीएसटी 27804 कोटी रुपये, सीजीएसटी 21,365 आयजीएसटी (केंद्रीय जीएसटी)असे एकूण 57,426 कोटी रुपये मिळाले. याशिवाय सेस करातून सरकारला 8,579 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

डिसेंबरमध्ये विक्रमी जीएसटी संकलन

हेही वाचा - राज्यात 3 हजार 160 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 29 रुग्णांचा मृत्यू

सरकारने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत एकूण 87 लाख जीएसटीआर-3 बी रिटर्न्स दाखल झाले आहेत. आयजीएसटी पैकी सीजीएसटी म्हणून सरकारने 23,276 कोटी रुपये नियमित सेटलमेंट तर 17,681 कोटी रुपये एसजीएसटी म्हणून सेटल केले आहेत. डिसेंबर 2020 मध्ये नियमित तोडगा निघाल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचे एकूण उत्पन्न सीजीएसटी म्हणून 44641 कोटी आणि एसजीएसटी म्हणून 45485 कोटी रुपये होते.जीएसटी संकलनातील ही वाढ उत्साह प्रतिबिंबित करते.

ABOUT THE AUTHOR

...view details