महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विशेष बातमी : मुंबई पालिकेकडून मालमत्ता कराची विक्रमी वसुली, ५ हजार मालमत्तांना नोटीस - मालमत्ता कराची विक्रमी वसुली

मुंबई महापालिकेचा जकात कर रद्द झाल्याने मालमत्ता कर वसुलीकडे पालिकेने जोर लावला आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांतील विक्रमी कर वसुली झाली आहे. त्याच प्रमाणे एप्रिल ते जून या ती महिन्यातही विक्रमी कर गोळा झाला आहे. तसेच मालमत्ता कराचे ३ हजार थकबाकीदार असून कर वसुलीसाठी ५ हजार मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

bmc
बीएमसी

By

Published : Jul 17, 2022, 7:20 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेचा जकात कर रद्द झाल्याने मालमत्ता कर वसुलीकडे पालिकेने जोर लावला आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांतील विक्रमी कर वसुली झाली आहे. त्याच प्रमाणे एप्रिल ते जून या ती महिन्यातही विक्रमी कर गोळा झाला आहे. तसेच मालमत्ता कराचे ३ हजार थकबाकीदार असून कर वसुलीसाठी ५ हजार मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



जकात कर रद्द, मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष -मुंबई महानगर पालिकेला जकात करामधून सर्वाधिक महसूल मिळत होता. वर्षाला सुमारे ७ हजार कोटी रुपयांचा महसूल जकात करामधून पालिकेला मिळत होता. मात्र केंद्र सरकारने देशभरात एकच कर म्हणजेच जीएसटी कर लागू केला. जकात कर रद्द झाला. जकात करामधून मिळणारा महसूल बंद झाल्याने केंद्र आणि राज्य सरकारकडून जीएसटीचा परतावा मिळत आहे. हा परतावा रद्द होऊ शकतो. यासाठी पालिकेला आपले स्वतःचे महासुलाचे स्त्रोत उभारण्यास सांगितले होते. त्यानुसार पालिकेने मालमत्ता कर वसुलीवर अधिक भर दिला आहे.


विक्रमी मालमत्ता कर वसुली -३१ मार्च २०२० पर्यंत ४१६१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला होता. ३१ मार्च २०२१ मध्ये त्यात किंचित वाढ होऊन ५०९१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला. ३१ मार्च २०२२ मध्ये ५७९२ कोटींचा मालमत्ता कर वसूल करण्यात पालिकेला यश आले आहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ पर्यंत पालिकेने ७०० कोटी रुपये अधिक कर वसूल केला आहे. ही गेल्या ३ वर्षातील विक्रमी कर वसुली आहे. पालिकेने या वर्षी ७ हजार कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट ठेवले आहे अशी माहिती पालिकेचे कर निर्धारण व संकलनचे सह आयुक्त सुनील धामणे यांनी दिली.


तिमाहीतही विक्रमी कर वसुली -एप्रिल २०२२ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. या नव्या आर्थिक वर्षात एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांच्या कालावधीत ३६२ कोटींचा मालमत्ता कर वसुव करण्यात आला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ३२० कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करण्यात पालिकेला यश आले होते. तिमाहीतही विक्रमी कर वसुली झाली आहे.


थकाबाकीदारांवर कारवाई -तीन हजार कोटींचा मालमत्ता कर थकवणाऱ्या पाच हजार मालमत्ताना पालिकेने नोटिस बजावली आहे. महिनाभरात थकबाकीदारांनी कराची रक्कम भरली नाही तर या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. थकबाकीदारांनी २५ टक्के रक्कम भरली किंवा पोस्ट डेटेड चेक दिल्यास लिलावाची कारवाई टळू शकते असे धामणे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details