महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चेंबूरच्या टेंभी पुलाच्या दुरुस्तीची मागणी मंजूर ?

चेंबूरच्या टेंभी पुलावरुन जाताना खबरदारीचा उपाय म्हणुन योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चेंबूरचा टेंभी पुल धोकादायक असल्याचे फलक लावताना जल अभियंता विभागाचे कर्मचारी

By

Published : Mar 31, 2019, 8:16 AM IST

मुंबई - मुंबईतील जुने पूल जागोजागी जीर्ण अवस्थेत आहेत. त्यात चेंबूरच्या टेंभी पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत होते. त्याची दखल महापालिकेच्या जल अभियंता विभागाने घेतल्याचे चित्र सध्याच्या परिस्थितीवरुन दिसतआहे.

चेंबूरचा टेंभी पुल धोकादायक असल्याचे फलक लावताना जल अभियंता विभागाचे कर्मचारी

पुलाच्या मध्यभागाला तडे गेले असल्याने या पुलावरुन खाली उतरण्यासाठीचा जिना अर्धवट पाडून चेंबूर रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकला जोडला आहे. हा अर्धवट जीना पादचाऱ्यांच्या केंव्हाही अंगावर कोसळून अपघात होऊ शकतो. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती दुरुस्ती करावी असे येथील नागरिकांची मागणी केली होती.

स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनास पत्र व्यवहार केला. प्रसिद्धी माध्यमातुनही ही मुद्दा उचलण्यात आला. तेंव्हा जल अभियंता विभाग जागा झाला. पुलावरुन जाताना खबरदारीचा उपाय म्हणुन योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details