मुंबई : मुंबई उच्च न्यायालयातील ( Bombay High Court ) वरिष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने समितीने केंद्र सरकार ला केली आहे. 29 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत प्रसन्न वराळे यांच्यासह इतर राज्यातील आणखी दोन न्यायमूर्तींची वेगवेगळ्या ठिकाणी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ( Karnataka High Court )
High Court of Karnataka : वरिष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्तीसाठी शिफारस - Karnataka High Court
मुंबई उच्च न्यायालयातील ( Bombay High Court ) वरिष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या ( Karnataka High Court ) मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने समितीने केंद्र सरकार ला केली आहे.
न्यायमूर्ती वराळे यांची कारकीर्द : सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वात कॉलेजियमची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. न्यायमूर्ती वराळे यांनी कायद्याची पदवी मिळविल्यानंतर ऑगस्ट-1985 पासून ऍड. एस. एन. लोया यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. दरम्यान, त्यांनी औरंगाबाद येथील आंबेडकर विधी महाविद्यालयात 1990 ते 1992 पर्यंत प्राध्यापक म्हणूनही कार्य केले. तसेच ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सहाय्यक सरकारी वकील म्हणून देखील काही काळ कार्यरत होते. त्यानंतर 18 जुलै 2008 रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून ते या न्यायालयात कार्यरत आहेत.
मुख्य न्यायालय न्यायमूर्ती पदी कोण येणार ?मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची नुकतेच झालेल्या कॉलेजियमने च्या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात यावी याकरिता राष्ट्रपती यांच्याकडे शिफारस केली आहे. त्यामुळे जर शिफारस मान्य झाल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायालय न्यायमूर्ती पदी कोण येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.