महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विक्रोळीत शिवसेनेच्या वतीन फेरीवाल्यांना दिल्याजात आहेत 10 रुपयांच्या पावत्या, मनेसे ने घेतला आक्षेप - मुंबई शिवसेने बद्दल बातमी

विक्रोळी शहरात शिवसेनेच्या वतीने 10 रुपयांच्या पावत्या दिल्या जात आहेत. या पावत्यांवर शिवसेना शाखा 118 असे लिहिलेले आहे.

विक्रोळीत शिवसेनेच्या वतीन फेरीवाल्यांना दिल्याजात आहेत 10 रुपयांच्या पावत्या, मनेसे ने घेतला आक्षेप

By

Published : Feb 4, 2021, 5:10 PM IST

Updated : Feb 4, 2021, 5:29 PM IST

मुंबई - विक्रोळीत शिवसेनेच्या वतीने फेरीवाल्यांना 10 रुपयांच्या पावत्या दिल्या जात आहेत. या पावत्यांनवर शिवसेना शाखा 118 अस लिहिलेले असून या पावतीवर बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. तसेच स्थानिक आमदार सुनील राऊत आणि नगरसेवक उपेंद्र सावंत यांचेही फोटो आहेत.

विक्रोळीत शिवसेनेच्या वतीन फेरीवाल्यांना दिल्याजात आहेत 10 रुपयांच्या पावत्या, मनेसे ने घेतला आक्षेप

जे काम महापालिकेचे आहे ते काम शिवसेना करत आहेत. सार्वजनिक पदपंथाचा वापर करणाऱ्याना उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलन करण्यासाठी आकार अस या पावतीवर लिहून पैसे वसूल केले जात आहेत. यावर मनसे ने आक्षेप घेतला आहे, तर फेरीवाल्यांनी 10 रुपयांच्या पावत्या फाडल्या आहेत. स्थानिक आमदार सुनील राऊत म्हणतात आमच्या नगरसेवकाने 10 रुपये मागितले 10 लाख रुपये नाही, तेही स्वच्छता करण्यासाठी मागितले तर काय झाले. विरोधक राजकारण करत आहेत, असा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे.

Last Updated : Feb 4, 2021, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details