महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rebel Threats Shakhapramukh : बंडखोर शिवसेना आमदारांकडून शाखाप्रमुखांना धमकी - Rebel Shivsena MLA

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( ShivSena rebel leader Eknath Shinde ) गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या ( ShivSena ) बंडखोर आमदारांनी ( Rebel Shivsena MLA ) आता विरोध करणार्‍या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांना धमक्या दिल्याची माहिती समोर येत आहे. भायखळा येथील एका शाखाप्रमुखांनी यासंदर्भात रितसर तक्रार देखील पोलिसात दाखल केली आहे.

यामिनी जाधव
यामिनी जाधव

By

Published : Jun 25, 2022, 2:24 PM IST

मुंबई -शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( ShivSena rebel leader Eknath Shinde ) यांच्या गटात सामील झालेल्या बंडखोर आमदारांच्या ( Rebel Shivsena MLA ) विरोधात आता स्थानिक शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी या आमदारांच्या फलकांना काळे फासले जात आहे तर काही ठिकाणी कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. मुंबईतील भायखळा विधानसभा मतदार संघाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याविरोधातही शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, अशा रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांना स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनी धमक्या दिल्या आहेत, असा आरोप शिवसेना शाखाप्रमुख विनोद शिर्के यांनी केला आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्यांनी धमक्या दिल्या असून यासंदर्भात आपण पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केल्याचे शिर्के यांनी सांगितले. यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांच्यावर यासंदर्भात कारवाई करावी, शिवसेनेच्या ( ShivSena ) भावनांशी खेळणाऱ्या या आमदारांना धडा शिकवू असा इशाराही शिर्के यांनी यावेळी दिला.

यामिनी जाधव, शिवसेना आमदार भायखळा

आम्हाला समजून घ्या -दरम्यान, आम्ही शिवसेनेतून का वेगळा गट स्थापन करतो आहे. आमच्यावर शिवसेनेत काय अन्याय झाला हे आता सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. आपण आजारी असताना कर्करोगासारख्या महाभयानक कर आजाराशी लढत असताना वरिष्ठ नेत्यांनी साधी विचारपूस देखील केली नाही. संकटाच्या काळात वरिष्ठ नेते सोबत राहत नसतील तर त्याचा काय उपयोग, असा भावनिक सवाल यामिनी जाधव यांनी उपस्थित केला आहे.

शिवसैनिक रस्त्यावर उतरू लागला -एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून फुटल्यानंतर संभ्रमित अवस्थेत असलेला शिवसैनिक आता रस्त्यावर उतरू लागला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर आणि आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर आता शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला असल्याने शिंदे गटाच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरू लागला आहे.

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : राजकीय आकसापोटी काढले शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, 38 आमदारांची ट्विट केली यादी

ABOUT THE AUTHOR

...view details