महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Uday Samant : शिवसेना पक्षावर दावा ठोकणार का?, उदय सामंतांनी स्पष्टचं सांगितलं... - उदय सामंत एकनाथ शिंदे

शिंदे गटाने आता शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकायला सुरुवात केली आहे. मात्र, आमचा शिवसेना पक्षावर कधीही दावा नव्हता आणि नसेल, असे स्पष्टीकरण बंडखोर आमदार उदय सामंत यांनी दिलं ( mla uday samant on shivsena logo ) आहे.

Uday Samant
Uday Samant

By

Published : Jul 8, 2022, 5:36 PM IST

मुंबई - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत बंडखोरी केल्यामुळे महाविकास सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत जात मुख्यमंत्रीपदाची तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बंडखोरी केल्यावर शिंदे गटाने आता शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकायला सुरुवात केली आहे. मात्र, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणी समितीच्या ठरावानुसार सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आहेत. ते लक्षात येताच शिंदे गटाचा आता सूर बदलला आहे. आमचा शिवसेना पक्षावर कधीही दावा नव्हता आणि नसेल, असे स्पष्टीकरण बंडखोर आमदार उदय सामंत यांनी दिलं ( mla uday samant on shivsena logo ) आहे. मुंबईत 'ईटिव्ही भारत'शी बोलताना शिंदे गट, पक्ष, चिन्ह आणि आरेचा निर्णय यावर त्यांनी आपले मत व्यक्त केलं आहे.

शिवसेनेचे आमदार शिंदे गटाला सामील झाले? -याबाबत उदय सामंत म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहोत. ज्या पद्धतीने घटकपक्षातून त्रास होत होता. शिवसेनेच खच्चीकरण केले जात होते, त्याच्यावर पर्याय म्हणून एकनाथ शिंदे हा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना हे वेगळे नाहीत. शिवसेनेला वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो.

उदय सामंत यांच्यांशी संवाद साधताना प्रतिनिधी

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर शिंदे गटातून दावा करण्यात येत आहे? - त्याबाबत सामंत यांनी म्हटलं, हे वृत्त कोठून येत माहिती नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आमदारांसोबत अशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. दीपक केसरकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेने भाजपसोबत युती केली आहे. पुढील घडामोडी करताना दिल्लीतील नेत्यांचा सहभाग लागणार आहे. निशाणी वर बोलण्यापेक्षा जोडण्याचे काम करावे, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली आहे.

आरेचा निर्णयाला शिवसेनेचा विरोध होता, मग? -त्यावर सामंत यांनी सांगितलं की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केलं आहे. आरेची कारशेड कोणाचे तरी खच्चीकरण करण्यासाठी किंवा कोणाचा निर्णय बदलण्यासाठी आम्ही करत नाही. पर्यावरणवाद्यांची शंका, गैरसमज झाला असेल, तर तो दूर करु, सगळ्या प्रयत्नानंतर तिथे कारशेड करु असे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

धनुष्यबाण कोण हिरावू शकणार नाही - गेल्या दोन दिवसांपासून आता धनुष्यबाणाचे चिन्हही पक्ष गमावणार असे चित्र निर्माण झाले होते. शिवाय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नव्या चिन्हासाठी तयार रहा, असेही सांगितले गेल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेनेचे चिन्ह हा धनुष्यबाण आहे. यावरच गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवाय 11 जुलै रोजी यासंबंधी न्यायालयात निकाल होणार आहे. पण न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे. शिवाय शिवसेना आणि धनुष्यबाण हे वेगळेच होऊ शकत नाही. कायद्यानुसार धनुष्यबाणाला कोणी हिरावू शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. यासंबंधी आपण अनेक कायदेतज्ञांशी बोललो असल्याचे त्यांनी सांगितले आहे. घटनेनुसार कोणीही धनुष्यबाण हिरावू शकत नसल्याचे, उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा -Uddhav Thackeray on Rebel MLA Shinde Group : बंडखोरांना न्यायालयाकडून सर्व पातळीवर मदत; नव्या चिन्हाची तयारी ठेवा - उद्धव ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details