महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde Latter : आमदार शिरसाठांचा लेटर बॉंम्ब; शिंदे म्हणाले, ही आमदारांची खरी भावना - बाळासाहेब ठाकरे

बंडखोर आमदार संजय शिरसाठ ( Rebel MLA Sanjay Shirsath ) यांनी लेटर बाँम्ब ( Eknath Shinde's letter bomb ) टाकला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत नाराजी व्यक्त केली आहे. हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमु्ख बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena chief Balasaheb Thackeray ) यांना वंदन करून पत्र लिहतो आहे असा उल्लेख त्यांनी पत्राच्या सुपवातीलाच केला आहे. पुढे शिरसाठ यांनी लिहले आहे की, काल वर्षा बंगल्याची दारे खऱ्या सर्वसामान्यासाठी उघडी असल्याचे त्यांनी पत्रात नमुद केले आहे. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दार गेली अडीच वर्ष अमच्यासाठी बंद होती. असा आरोप त्यानी केला.

Sanjay Shirsath Letter to CM Thackeray
संजय शिरसाठ यांची पत्रातून टिका

By

Published : Jun 23, 2022, 1:11 PM IST

Updated : Jun 23, 2022, 3:25 PM IST

मुंबई -बंडखोर आमदार संजय शिरसाठ ( Rebel MLA Sanjay Shirsath ) यांनी लेटर बाँम्ब ( Eknath Shinde's letter bomb ) टाकला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत नाराजी व्यक्त केली आहे. हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमु्ख बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena chief Balasaheb Thackeray ) यांना वंदन करून पत्र लिहतो आहे असा उल्लेख त्यांनी पत्राच्या सुपवातीलाच केला आहे. पुढे शिरसाठ यांनी लिहले आहे की, काल वर्षा बंगल्याची दारे खऱ्या सर्वसामान्यासाठी उघडी असल्याचे त्यांनी पत्रात नमुद केले आहे. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दार गेली अडीच वर्ष अमच्यासाठी बंद होती. असा आरोप त्यानी केला. तर दरम्यान त्यांचे हे पत्र एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, ही खरी शिवसेना आमदाराची भुमिका आहे.

घराची दारे सर्वसामान्यांसाठी उघडली -काल वर्षा बंगल्याची दारे खन्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारे गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, विधान परिषद तसेच राज्यसभेत आमच्या जीवावर निवडून जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती अशी टिका त्यांनी पत्रातून केली.

आम्हाला डावलून निवडणुकीची रणनिती ठरवली - हेच so called (चाणक्य) कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा तसेच विधान परिषदची रणनिती ठरवत होते. त्यांचे निकाल काय झाले. ते, अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण, आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही असा ठेट आरोप त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

साहेबांना भेटायण्याची विनंती- मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी, अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवले असा निरोप बडव्यांकडून यायचा. पण, तासनतास बंगल्याच्या गेटवर उभे ठेवले जायचे. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर. बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का ? असा प्रश्न त्यांनी मुख्यमत्र्यांना पत्रातून विचारला.

हाल अपेक्षा आमदारांनी सहन केल्या - सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र, याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान हे फक्त पक्षात शिंदे साहेबच ऐकत होते. तसेच त्यावर सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला असे पत्रात नमुद केले आहे.

आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं ? -हिंदुत्व, अयोध्या राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं ? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की, आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. जे गेलेत त्यांना तुम्ही स्वत: परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता. त्यामुळे आम्ही परत घरी आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ -आम्हालावर्षावर प्रवेश मिळत नव्हता मात्र, विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार तुम्हाला नियमित भेटत होते. मतदारसंघातली कामे करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन तसेच उद्घाटने करत होते, तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री खरच आपला आहे का? असा प्रश्न त्यांनी पत्रातून उपस्थित केला.

आम्ही शिंदे साहेबांसोबत -या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचे माननीय बाळासाहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे हिंदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठिण प्रसंगांत त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते. आजही आहेत, उद्याची राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत असल्याचे आमदार शिरसाठ यांनी म्हटले आहे. काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होते. पण. त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरे कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारे हे भावनिक पत्र लिहावे लागत असल्याचे शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : 'त्या' आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं, संजय राऊत यांचा इशारा

हेही वाचा -Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीची शिवसेनेला पुर्ण साथ;राऊतांना फ्लोअर टेस्टचा विश्वास; शिंदेच्या बंडाचे काय होणार

Last Updated : Jun 23, 2022, 3:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details